एक्स्प्लोर

Shivsena UBT: राजूल पटेलांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी शिंदेसेनेत केला प्रवेश; 24 तासाच्या आत शाखा खाली करण्याचा दिला इशारा

Shivsena UBT: राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी पक्षाची साथ सोडली आहे. राजुल पटेल यांनी कार्यकर्त्यांसह काल (सोमवारी  ता. 27) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावरच कट्टर शिवसैनिक असलेल्या राजूल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. 

राजूल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. राजूल पटेल यांची शाखा क्रमांक 61 खाली करावी, ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात आला आहे. 24 तासाच्या आत ही शाखा खाली करावी अन्यथा शाखा ताब्यात घेऊ ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आला आहे. राजुल पटेल या शाखेमध्ये काम करत होत्या ती शाखा ठाकरेंच्या शिवसेनेची आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ती शाखा तातडीने खाली करावी असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे. 

यासाठी काल शाखेत ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यासोबत आमदार अनिल परब स्थानिक आमदार हारून खान हे शाखेसमोर उपस्थित होते. मात्र, शाखेला लॉक असल्याने शाखा ठाकरेंच्या शिवसेनेकडून ताब्यात घेता आली नाही, त्यामुळे आजच्या दिवसात शाखा खाली करावी, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. पटेल या शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्या होत्या. चार वेळा नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या होत्या. आरोग्य समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. पक्षाच्या उपनेत्या, विधानसभा महिला संघटक पदी त्यांनी काम केले होते.

विधानसभा निवडणुकीमध्ये वर्सोवा मतदारसंघातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र,पक्षाकडून हारून खान यांना संधी देण्यात आल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. वर्सोवा मतदारसंघात पटेल यांचे राजकीय वजन आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटेल यांच्या प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.तर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वर्सोवा विधानसभेतील अंतर्गत राजकारणाला मी कंटाळले होते. चांगली वागणूक मिळत नव्हती. अंतर्गत राजकारणामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं राजूल पटेल यांनी सांगितलं आहे. 

शाखा कोणाच्या बापाची नाही - अनिल परब 

राजूल पटेल यांच्या निर्णयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांना मी स्वतः बहिणीप्रमाणे समजत होतो, त्यांच्या 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत विभागप्रमुख म्हणून उभा राहिलो. ज्या शिवसेना पक्षांमुळे बाळासाहेबांच्या उद्धवजींच्या आशीर्वादामुळे समाजात ओळख मिळाली. शेवटी आज त्यांनी गद्दारी केली. ही गद्दारी कशाला केली पैशासाठी की कशासाठी हे त्यांना त्यांच माहिती आहे. त्यांच्याकडे असलेली ही शाखा वाचवण्यासाठी शिवसैनिकांनी रक्त दिलेलं आहे. मी आज हे सांगायला आलोय त्यांना वाटतंय दुसऱ्या पक्षात जाऊन खुप मिळेल त्यांना लख लाभो, ही शाखा आपल्याला सोडायची नाही, ही शाखा कोणाच्या बापाची नाही असंही परब यांनी म्हटलं आहे.

अनेकांनाच्या ताकदीवर ही शाखा उभी राहिली आहे. पोलीसांना सांगतोय चावी आम्हाला आणून द्या, नाहीतर टाळ तोडून आम्ही आमची शाखा घेऊ. आमच्या शिवसैनिकांच्या नादाला लागू नका. आपल्याला काळजी करायची गरज नाही, आपला आमदार इथं आहे. कोणी पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलेले नाही. त्यांना कळेल की त्यांना मानसन्मान इथं मिळत होता. पण आता त्या रस्त्याने जाताना गद्दार म्हटलं जाईल तेव्हा कळेल. प्रत्येक वेळी चौपाटीवर मिटिंग व्हायची तेव्हा प्रत्येक वेळी राजूल ताईंना तिकीट द्यायचो. पण आता होऊन जाऊ द्या, आता कशा निवडून येतात त्या पाहू. काहीही किंमत मोजावी लागेल तरी चालेल पण इथं आपलेच उमेदवार निवडून येतील. तुम्ही खंबीर उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही असा विश्वास देखील त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला आहे. 

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
Embed widget