एक्स्प्लोर
विधानभवनाबाहेर स्वाभिमानीचं आंदोलन, राजू शेट्टी ताब्यात
मुंबई : विधानभवनाच्या गेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
विधानभवनाच्या मेन गेटबाहेर घोषणाबाजी करत राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह कांदाफेको आणि तूरडाळ फेको आंदोलन केलं. आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती.
दरम्यान, पोलिसांनी राजू शेट्टींसह आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
आंदोलन माझ्याविरोधात नाही : खोत
"हे आंदोलन माझ्याविरोधात नाही. राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. तसंच हे आंदोलन आहे. आमच्यात संवाद आहे. कम्युनिकेशन गॅप नाही," असं स्पष्टीकरण राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement