एक्स्प्लोर
राज ठाकरेंच्या भाषणातला 'पोपट' पाकिस्तानचा तर नाही ना? विनोद तावडेंचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या भाषणातला 'पोपट' पाकिस्तानचा तर नाही ना? असा प्रश्न विचारत तावडे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरेंच्या भाषणातला 'पोपट' पाकिस्तानचा तर नाही ना? असा प्रश्न विचारत तावडे यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. राज ठाकरे पाकिस्तानचे हिरो होऊ पाहताहेत, अशा शब्दांत तावडेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईतल्या रंगशारदा सभागृहामध्ये आज (मंगळवार)झालेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना 'पोपट' या शब्दाचा वापर केला होता. परंतु पोपट शब्दाच्या वापरावरुन तावडेंनी राज ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे. "पोपटाचा रंग हिरवा असतो तो पाकिस्तानचा तर नाही ना?" असा उपरोधिक सवाल तावडेंनी उपस्थित केला आहे.
तावडे म्हणाले की, "रंगशारदा सभागृहात नेहमी अनेक नाटकं होतात. आज तिथे अजून एक नाटक पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तसा 'बारामतीचा पोपट' या मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित करणारे आजचे भाषण होते."
"तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा निवडणूक लढवा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा" असे आव्हान तावडे यांनी राज ठाकरेंना दिले आहे.
वाचा राज ठाकरे काय म्हणाले होते : मोदी-शाहांविरोधात सभा घेणार, राज ठाकरेंची घोषणा, फडणवीसांचाही समाचार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement