एक्स्प्लोर

अॅप्रेंटिसच्या आंदोलनाला राज ठाकरेंची साथ

आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करुन घेऊ, असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं.

मुंबई : मनसेचं शिष्टमंडळ उद्या (21 मार्च) दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थी मुलांचं शिष्टमंडळही सोबत असणार आहे. आज राज ठाकरे यांनी रेल्वेतल्या प्रशिक्षणार्थींची भेट घेतली. त्यावेळी राज यांनी प्रशिक्षणार्थींना भरती प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. साडेतीन तास आंदोलन केल्यानंतर रेल्वतील परीक्षार्थींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. एमआयजी क्लबजवळ आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. त्याआधी आंदोलकांनी राज ठाकरेंसोबत चर्चा केली. आंदोलकांसोबत रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी येतील आणि तुमच्या मागण्या मान्य करुन घेऊ, असं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी आंदोलकांना दिलं. सकाळपासून काय झाले? तब्बल साडेतीन तास मुंबईकरांची नाकेबंदी केल्यानंतर, अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आपला रेल रोको मागे घेतला आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतलं. सकाळी 7 वाजल्यापासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून, रेल्वे वाहतूक ठप्प केली होती. ती वाहतूक सकाळी पावणे अकराच्या सुमारास सुरु करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेलं आंदोलन साडेतीन तासांनी मागे घेण्यात आलं.  येत्या दोन ते तीन दिवसात मागण्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन रेल्वेकडून अॅप्रेंटिसच्या उमेदवारांना देण्यात आलं. त्यानंतर आंदोलक ट्रॅकवरुन हटले.त्यामुळे रखडलेली वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात येत आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या, त्यापाठोपाठ लोकलही रवाना झाल्या. दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक विचार झाला नाही, तर आजच्या प्रमाणे अचानक आंदोलन करु, असा इशारा अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी दिला. 20 टक्के कोटा रद्द करण्याची मागणी पूर्वी रेल्वे अप्रेंटिसना थेट रेल्वेत सामावून घेतलं जायचं, पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेलाय, शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतल्या संधी कमी झाल्याचा युवकांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे. रेल्वे अॅप्रेंटिसच्या मागण्या काय आहेत?
  • 20 टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा.
  • रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावं.
  • रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावं, भविष्यातही नियम लागू ठेवावा.
  • याबाबत एका महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget