एक्स्प्लोर

Raj Thackeray : 'शारीरिक वजन कमी करुन मला सामाजिक वजन वाढवण्याची गरज'; राज ठाकरेंची मिश्किली

Raj Thackeray On Weight : शारीरिक वजन कमी करुन मला सामाजिक वजन वाढवण्याची गरज आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

Raj Thackeray On Weight: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. फिट राहण्यासाठी वजन कमी करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मात्र वजन वाढवायचंय. पण हे वजन आहे सामाजिक वजन. शारीरिक वजन कमी करुन मला सामाजिक वजन वाढवण्याची गरज आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली आहे. राज ठाकरेंचे व्याही डॉ. संजय बोरुडे यांनी लठ्ठपणावर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

प्रोफेसर संजय बोराडे यांच्या जनरेशन XL या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (23 मे) पार पडला. जनरेशन XL या लहानमुलांमधील स्थुलता या विषयावरील पुस्तक आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ गायिका आशा भोसले , अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) हे उपस्थित  होते. लोअर परळच्या कोरम क्लबमध्ये हा सोहळा पार पडला. 

राज ठाकरेंनी म्हटलं की, माझं वजन सध्या 82-83त आहे. आता कंट्रोल केलं नाही तर मी पण वजनाच्या नव्वदीत जाईन.  आजकाल घराघरात डॉक्टर आहे. डायनिंग टेबलवर बसलं की प्रत्येक जण डॉक्टर होतो.  वयानुरुप कमी खाल्लं पाहीजे. शर्मिला नेहमी सांगते की तुझा संकल्प करण्याचा उद्या कधी येतच नाही. मलाही अनेक आरोग्य समस्यांमधून जावं लागतं आहे. आधी बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस खेळायचो, आता मला काहीच व्यायाम करता येत नाही. खेळणं आता बरंच कमी झालंय. म्हणून एकदा काय ते ऑपरेशन करुन टाकू असं ठरवलं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. ऑपरेशन झाल्यावर फार धावता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलंय तर मी त्यांना म्हटलं मी काही पाकिटमार आहे काय धावायला? असं म्हणताच पुन्हा सभागृहात हशा पिकला.

राज ठाकरेंनी म्हटलं की, माझं वजन वाढण्याचं कारण हे मी कदाचित शिव्या खूप खातो म्हणून असेल. आता माझं शारिरीक वजन घटवून सामाजिक वजन वाढवायची वेळ आली आहे, असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. 

यावेळी राज ठाकरे यांनी आशा भोसले यांचं कौतुक करताना म्हटलं की, आशाताई उत्तम सुगरण आहेत. उत्तम जेवण बनवतात. मला एकदा त्यांनी घरी जेवायला बोलावलेलं. तर अख्खं डायनिंग टेबल भरला होता. आणि ते फक्त माझ्यासाठी होतं, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Jackie Shroff : 'मला राजनं सांगितलं होतं महाराष्ट्रात राहतो तर मराठीमध्ये बोलता आलं पाहिजे': जॅकी श्रॉफ

Asha Bhosale : 'लग्न झाल्यानंतर बायकांचं वजन वाढतं, पिझ्झा सोडा भाकरी खा'; अशा भोसलेंनी दिल्या फिटनेस टिप्स

महत्त्वाच्या बातम्या

Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget