मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रसारमाध्यमांकडून आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन नाही, तर पाकिस्तान आणि बांगलादेशातून बेकायदेशीररित्या आलेल्या मुस्लिमांना हाकला, असं राज ठाकरे यांनी म्हटल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.


राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.


राज ठाकरे यांनी आधीपासूनच स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी आणि इतर नागरिकांना भारतातून हाकलून लावा, अशी राज ठाकरे आणि मनसेची भूमिका आहे. देशात 135 कोटी लोकं आधीच राहत आहेत तर आणखी लोकांना नागरिकत्व काय द्यायचं? अशी राज ठाकरेंनी आधीच बोलून दाखवलं होतं. देशात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांना हुसकावून लावण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. त्यामुळे ज्या भूमिका राष्ट्रहिताच्या आहेत, त्याला राज ठाकरेंचं समर्थन आहे, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.


मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात बोलाताना राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की, देशातील घुसखोरांना हुसकावून लावण्यास केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात जे मोर्चे काढले जात आहेत, तो संशोधनाचा विषय आहे. मात्र मोर्चांना मोर्चानेच उत्तर दिलं पाहिजे. त्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.


MNS Morcha | न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढा : राज ठाकरे | ABP Majha


संबंधित बातम्या