एक्स्प्लोर

कोस्टल रोडवरुन सेना-मनसेत युद्ध रंगणार, राज ठाकरेंनी घेतली कोळी बांधवांची भेट

प्रकल्पाला विरोध करणाऱ्या वरळीतील स्थानिकांशी त्यांनी संवादही साधला. कोस्टलरोडमुळे मासेमारी धोक्यात येत असल्यानं कोळी बांधवांचा याला विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याची माहिती राज ठाकरेंना कोळी बांधवांच्या वतीनं देण्यात आली होती.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळीतील कोस्टल रोडमुळं बाधित होणाऱ्या मच्छिमारांची भेट घेतली . प्रकल्पाला विरोध करणाऱ्या वरळीतील स्थानिकांशी त्यांनी संवादही साधला. कोस्टलरोडमुळे मासेमारी धोक्यात येत असल्यानं कोळी बांधवांचा याला विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याची माहिती राज ठाकरेंना कोळी बांधवांच्या वतीनं देण्यात आली होती. कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वीच राज ठाकरेंनी मच्छिमारांची भेट घेतली आहे. तांत्रिक गोष्टी पहिल्या तर प्रशासन यातून मार्ग काढू शकतो मात्र जर प्रशासनाने आठमुडेपणा ची भूमिका घेतली तर संघर्ष करावा लागेल अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे. त्यासाठी राज ठाकरे  मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसंच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे. मात्र प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सि-लींकचा कोस्टल रोडच्या टप्प्याला विरोध आहे. कारण, इथं आधीच वांद्रे-वरळी सी-लिंक उभा आहे आणि आता याच ठिकाणी आणखी कोस्टल रोडचे पिलर उभे राहतील. त्यामुळे समुद्रात होड्यांची ये-जा करणं कठीण होणार आहे. वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु कोस्टल रोडमुळे ही व्होट बँक शिवसेनेपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोस्टल रोडवरुन मनसे-शिवसेनेत राजकारण तापणार, असंच चित्र आहे. कोळी समाजाच्या मागण्या काय आहेत?
  • कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं.
  • समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी.
  • माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात.
  • वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे.
  • कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता आहे.
कोस्टल रोड हा विकासाचा महामार्ग ठरणार असला तरी त्यामुळे येणाऱ्या छुप्या संकटांचा सध्या अंदाजही लावला जाऊ शकत नाही.समुद्रात भराव टाकल्यानंतर भरतीच्या, वादळाच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती ही हजारो जीवांवर बेतणारी असू शकते. कोस्टल रोड कसा आहे?
  • प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किमी लांबीचा कोस्टल रोड असणार आहे.
  • समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसेच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे.
  • कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 5303.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
  • एकूण प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार 721 कोटींवर पोहचला आहे.
  • कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुस्साट होणार आहे.
  • हा प्रकल्प झाल्यास दरवर्षी 34 टक्के अर्थात 350 टन इंधनाची बचत होणार आहे.
  • या मार्गावरच पावणेतीन मीटर रुंदीची बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल. तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल.
  • हा मार्ग पॉट होल फ्री व्हावा अर्थात खड्डे पडू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.
संबंधित बातम्या मुंबईकरांना हवाहवासा वाटणारा कोस्टल रोड कोळी बांधवांना नकोसा 

कोस्टल रोडवरुन मनसे-शिवसेना आमनेसामने

 

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबईतही आंदोलनाची हाक; तर कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत नागपुरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget