एक्स्प्लोर

रेल्वे प्रशासन खडबडून जागं, 200 अधिकाऱ्यांना ऑन फिल्ड पाठवणार

रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत.

मुंबई : एलफिन्स्टन पादचारी पुलावरच्या चेंगराचेंगरीत 23 जणांनी आपला जीव गमवल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आतापर्यंत एसी ऑफिसमध्ये खुर्ची उबवणाऱ्या 200 रेल्वे अधिकाऱ्यांना आता काम करण्यासाठी फिल्डवर धाडण्यात येणार आहे. https://twitter.com/PiyushGoyal/status/914050881158443008 रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत. रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकारी पश्चिम आणि पूर्व रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे मुद्दे पियुष गोयल यांनी ट्वीट केले आहेत. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काय आदेश दिले आहेत? - रेल्वे सुरक्षेसंदर्भात प्रकल्पांमधे लालफितीचा अडथळा दूर करण्यासाठी पश्चिम आणि पूर्व रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. - मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्टेशन्स आणि अतिगर्दीच्या रेल्वेस्थानकांवर अतिरिक्त एस्कलेटर्सना मान्यता देण्यात आली आहे. - फिल्डवरील कामाचा वेग आणि तत्परता वाढवण्यासाठी रेल्वे  मुख्यालयातील 200 अधिकाऱ्यांना ऑफिसमधून फील्डवर धाडलं जाईल. - पुढील 15 महिन्यात सर्व उपनगरीय ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. शिवाय, त्याचवेळी देशभरातील ट्रेनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम केले जाईल. चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. संबंधित बातम्या : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर चेंगराचेंगरीमुळे महाराष्ट्र दु:खात, दोषींवर कठोर कारवाई करणार : मुख्यमंत्री एल्फिन्स्टन दुर्घटना : 24 वर्षाच्या हिलोनीचा चेंगराचेंगरीत मृत्यू एल्फिन्स्टन दुर्घटना : वडिलांशी चुकामूक श्रद्धाच्या जीवावर बेतली एल्फिन्स्टन दुर्घटना : ऑफिसच्या शेवटच्या दिवशी तेरेसा यांचा मृत्यू स्टेशनवरील कामं दोन आठवड्यात सुरु करा, पियुष गोयल यांचे आदेश दसऱ्यासाठी फुलं आणायला गेलेल्या दोन मैत्रिणींचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू एल्फिन्स्टन दुर्घटनेत ज्योतिबा चव्हाण यांचा मृत्यू कुटुंबाचा एकमेव आधार हरपला, मयुरेशचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : … तर ही दुर्घटना टाळता आली असती! दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदाचा चेंगराचेंगरीत दुर्दैवी अंत एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मुंबईतील ही स्टेशन्स मृत्यूचा सापळा! बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Embed widget