एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेच्या ई तिकिटांचा काळाबाजार, दलालांचे मोठे रॅकेट उध्वस्त, दहशतवादी कृत्यांसाठी पुरवले जायचे पैसे
या रॅकेटमध्ये दलालांची एक यंत्रणाच उभारण्यात आली होती. त्यात अॅडमिन, सुपर सेलर, सेलर्स आणि क्लाईन्ट्स हे मुख्य सूत्रधाराला टीएसएस वॉलेट अकाऊंटमधून, हवालाच्या माध्यमातून किंवा बिटकॉईन सारख्या यंत्रणेने कोट्यवधी रुपये पाठवत होते.
मुंबई : रेल्वेच्या कन्फर्म ई तिकिटांचा काळाबाजार करून कोट्यवधी रुपये दहशतवादास पुरवणाऱ्या दलालांचे रॅकेट उध्वस्त केले आहे. 2012 पासून सुरू असलेल्या या रॅकेटचे मास्टरमाइंड मुंबई, नवी मुंबईसह सुरत, दुबईपर्यंत पोचले होते. या कारवाईत आरपीएफने देशभरतील दलालांकडून पुढील तारखेची तब्बल 27 हजार 948 तिकिटे जप्त करून रद्द केली आहेत. आरपीएफचे महासंचालक अरुणकुमार यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली. हे रॅकेट चालवणारा मुख्य सुत्रधार अमिन काग्झी यास आरपीएफने सुरतमधून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तिकिटांचा काळाबाजार करुन येणारी रक्कम ही दहशतवादी कृत्य करण्यासाठी पुरवली जायची अशी माहिती देखील अरुणकुमार यांनी दिली आहे.
एएनएमएस आणि मॅक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून 2016 नंतर सूत्रधार एकावेळी हजारो ई तिकिटांचे बुकिंग करणारे सॉफ्टवेअरची विक्री करत होते. अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून हा तिकिटांचा काळा बाजार केला जायचा. यामध्ये दलालांची एक यंत्रणाच उभारण्यात आली होती. त्यात अॅडमिन, सुपर सेलर, सेलर्स आणि क्लाईन्ट्स हे मुख्य सूत्रधाराला टीएसएस वॉलेट अकाऊंटमधून, हवालाच्या माध्यमातून किंवा बिटकॉईन सारख्या यंत्रणेने कोट्यवधी रुपये पाठवत होते. मुख्य सुत्रधारासह एकूण 89 अडमिनला या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
रेल्वेत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने कबड्डी खेळाडूंची फसवणूक, आरोपीला अटक
संपूर्ण देशात केलेली कारवाई - कारवाईत 2 अॅप्पल मॅकबुक, 10 हाय प्रोसेसिंग सीपीयुज्, 10 लॅपटॉप्स, 1 हार्ड डिस्क, 13 स्मार्ट फोन्स, 6 इतर फोन्स केले जप्त - सॉफ्टवेअर चालवणार्या प्रमुख 89 व्यक्तींना या कारवाईत केली अटक - 16 हजार 735 बनावट लॉगिन आयडी शोधून केले बंद - 27 हजार 948 लाईव्ह तिकिटे आरपीएफने केली जप्त आणि रद्द. - तिकिटांची किंमत तब्बल 7 कोटी 96 लाख 23 हजार 628 रुपये - आधी प्रवास करून झालेली 1 लाख 60 हजार 989 तिकिटे कारवाईत सापडली, किंमत तब्बल 30 कोटी 20 लाख 87 हजार 649 रुपयेPune Railway Stationवर खास सुविधा, दहा रुपये मोजून मोबाईल लॉकर्सची सुविधा
रेल्वेला कसे फसवले जायचे? - 2 सॉफ्टवेअर वापरून हा सर्व खेळ केला जायचा - सामान्य प्रवाशांना रेल्वे तिकिटे काढताना आवश्यक कॅप्चा आणि ओटीपी बायपास करत थेट तिकिटांचे बुकिंग या सॉफ्टवेअरमधून व्हायचे, - आगाऊ तिकिटे बुक करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर्स अपग्रेड करण्यासाठी फ्रिलान्सिंग करणार्या सॉफ्टवेअर डेव्हलपरची मदत घेतली जायची. - यामध्ये दलालांची एक यंत्रणाच उभारण्यात आली होती. त्यात अॅडमिन, सुपर सेलर, सेलर्स आणि क्लाईन्ट्स हे मुख्य सूत्रधाराला टीएसएस वॉलेट अकाऊंटमधून, हवालाच्या माध्यमातून किंवा बिटकॉईन सारख्या यंत्रणेने कोट्यवधी रुपये पाठवत होते. - तिकिटे काढण्यासाठी बनावट केवायसीही या सॉफ्टवेअरमध्ये निर्माण केली जात होती. - तिकिटांचा काळाबाजार आणि त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरच्या विक्रीतून निर्माण होणार्या काळ्या पैशातून दुबईसह परदेशात विविध ठिकाणी मालमत्ताही विकत घेण्यात आल्या आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement