एक्स्प्लोर

कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट! ठाण्यानंतर कल्याणमध्येही थायरोकेअर लॅबच्या टेस्टवर प्रश्नचिन्ह

ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेकडून देखील थायरोकेअर लॅबवर कारवाई होण्याची चिन्हं आहेत. केडीएमसीनं थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली आहे. नोटीसची मुदत संपूनही लॅबकडून उत्तर मिळालेलं नाही.

कल्याण : ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेकडून देखील थायरोकेअर लॅबवर कारवाई होण्याची चिन्हं आहेत. लॅबने चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप झाल्यानंतर केडीएमसीनं थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली आहे. नोटीसची मुदत संपूनही लॅबकडून उत्तर मिळालेलं नाही. कल्याणच्या शहाड परिसरात राहणारे शरद पाटील यांनी थायरो केअर लॅबने चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप केला आहे.
माहितीनुसार, पाटील हे मे महिन्यात घरातच पडल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. हातावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं असल्यामुळे आधी त्यांची थायरोकेअर लॅबकडून कोरोना टेस्ट करण्यात आली. 19 मे रोजी त्यांनी ही टेस्ट केली, ज्याचा रिपोर्ट 21 मे रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जायबंदी हातासह कल्याणच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. मात्र शरद पाटील हे अनेक दिवसात घराबाहेरच पडलेले नसल्यानं कोरोनाची लागण कशी झाली, याबाबत ते साशंक होते.
त्यामुळे त्यांनी दोनच दिवसांनी म्हणजे 23 मे रोजी पुन्हा एकदा मेट्रोपोलीस लॅबकडून कोरोना टेस्ट केली. ज्याचा 24 मे रोजी निगेटिव्ह रिपोर्ट आला. यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून तातडीनं डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या सगळ्यामुळे थायरोकेअरनं दिलेले पॉझिटिव्ह रिपोर्ट सदोष असल्याबाबत त्यांची खात्री झाल्यानं त्यांनी लगेचच केडीएमसी आयुक्तांकडे याची लेखी तक्रार केली.
त्यानुसार केडीएमसीनं 1 जून रोजी थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली असून 48 तासात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या लॅबवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता 48 तास संपून 8 दिवस उलटून गेले तरीही थायरोकेअर लॅबने केडीएमसीच्या नोटीसला काहीही उत्तर दिलेलं नसून केडीएमसीनंही अद्याप या लॅबवर कारवाई केलेली नाही.
ठाण्यातही या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कारवाई करण्यात आली होती.  या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. आता कल्याण डोंबिवली महापालिकेनेही या लॅबवर कारवाई करावी, अशी मागणी पीडित पाटील दाम्पत्याने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Video: चिमुकल्याकडून मगात पाणी घेत अन् साबण लावून चक्क सापाचं सर्व्हिसिंग! व्हिडिओ पाहून अनेकांना घामटा फुटला
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
कुर्डूस गावातील विहिरीवरची दहीहंडी, तरुणाईचा उत्साह, गोविंदांची उंचच उंच उडी; जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Mumbai Metro 3: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाची सेवा मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरु राहणार
गुड न्यूज, गणेशोत्सवात मुंबई मेट्रो लाईन-३ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार, MMRC चा मोठा निर्णय  
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Embed widget