एक्स्प्लोर

कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई

एका घरातील एकूण बारा जणांची चाचणी या खाजगी लॅब मधून केली होती. त्यासाठी 36 हजार रुपये घेतले.या चाचणीचा रिपोर्ट आला, त्यात सहा जण पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आले. मात्र नंतर सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यावर ते रिपोर्ट निगेटिव्ह आले.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने एका खाजगी लॅबवर कारवाई केली आहे. या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. थायरो केअर नावाची ही खाजगी लॅब आहे. या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. मुंब्रा येथे राहणारे समीर खान यांचे कुटुंब आहे. या कुटुंबात आधारस्तंभ असलेल्या त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यामुळे घरातील एकूण बारा जणांची चाचणी थायरोकेयर या खाजगी लॅब मधून समीरने करून घेतली. त्यासाठी त्याने 36 हजार रुपये मोजले. ज्यावेळी या चाचणीचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह असल्याचा निदर्शनास आले. त्यांच्या घरी थेट महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना घेऊन जाण्यास आले. त्यानंतर विलगीकरण कक्षात असताना ठाणे महानगरपालिकेकडून त्यांची दुसऱ्या दिवशी चाचणी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे खाजगी लॅबच्या अहवालांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याला फॉल्स पॉझिटिव्ह रिपोर्ट असे म्हणतात. या संपूर्ण प्रकारामुळे आम्हाला खूप त्रास झाला, आमचे पैसे देखील फुकट गेले, त्यामुळे निदान आमचे पैसे तरी परत मिळावे, कारण आमची परिस्थिती वाईट आहे, अशी मागणी समीरने सरकारकडे केली आहे. ठाणे महापालिकेचा दोन खासगी रुग्णालयांना दणका, जवळपास 16 लाख रुपये दंडाची कारवाई ही घटना झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने या खाजगी लॅब वर कारवाई करण्याचे ठरवले. एक नोटीस पाठवून महानगरपालिका क्षेत्रात यापुढे चाचण्या न करण्याचे आदेश दिले आहेत. तुर्भेमध्ये असलेल्या या लॅबवर अतिरिक्त आयुक्तांनी कारवाई केली आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त, संदीप माळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. या दुर्दैवी प्रकारानंतर समीर खानच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. यासोबत अनाठाई त्यांचे पैसे देखील वाया गेले. त्यामुळे सरकारने या प्रकाराकडे लक्ष देऊन अशा घटना होऊ नये यासाठी खाजगी लॅब्स वर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे असे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; पालिकेकडून खबरदारीचे आवाहन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget