एक्स्प्लोर
मुंबईतल्या भांडुपमध्ये स्वच्छतागृह खचलं, दोघांचा मृत्यू
मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

मुंबई : मुंबईतील भांडुपमध्ये टँक रोड परिसरात असलेल्या पाटीलवाडीतलं अख्खं सार्वजनिक शौचालय खचलं आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालयं होती तिथे मोठा खड्डा पडला आहे. आज (शनिवार) सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या शौचालयांच्या ढिगाऱ्याखाली 2 महिला आणि 2 पुरुष अडकले होते. अनेक तासांपासून हे लोक खचलेल्या शौचालयाखाली अडकले होते. अखेर अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाच्या जवानांनी दोघांचे मतदेह बाहेर काढले आहेत. या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका आपत्ती निवारणाचे जवान अडकलेल्या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करत आहे.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती






















