एक्स्प्लोर

मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र पार्किंग प्राधिकरणाचा प्रस्ताव

वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्याही गंभीर होत चाललीय, अशी चिंता व्यक्त करताच पालिकेच्यावतीने मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र पार्किंग प्राधिकरण निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहीती देण्यात आली.

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवरील दिवसभराचा सरासरी वेग हा ताशी 20 किमी. इतकाच आहे. खुद्द मुंबई महानगरपालिकेने आपल्या अहवालात ही बाब कबूल केली. यावरून मायानगरी मुंबईत ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस किती भीषण होतेय, हे लक्षात येतं. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्याही गंभीर होत चाललीय, अशी चिंता व्यक्त करताच पालिकेच्यावतीने मुंबईच्या विकास आराखड्यात स्वतंत्र पार्किंग प्राधिकरण निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहीती देण्यात आली. पालिकेच्या या निर्णयाचं हायकोर्टानेही स्वागत केलं. यासंदर्भात जनहित मंच या सेवाभावी संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. शहरातील वाढत्या ट्राफिकचा मुंबईकरांना दररोज सामना करावा लागतो. या ट्राफिकमुळे नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी वेळेत पोहोचताही येत नाही. मात्र याचा सर्वात मोठा फटका बसतो तो अग्निशमन दल आणि रूग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवांना. वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडलेल्या दिसतात. मुंबईसारख्या शहरांत अनेक मोठ-मोठ्या हॉस्पिटल्सकडे जायलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नाहीत, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने मुंबईतल्या ट्राफिकवर नाराजी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना पार्किंग उपलब्ध असल्याचे पुरावे सक्तीचे करण्याबाबत प्रशासनाने गंभीरतेने विचार करावा, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. शिवाय लोकांनी खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्यासाठी आधी त्यांचाही विकास करणं गरजेचं असल्याचं हायकोर्टाने म्हटलं. मुंबईसाठी रेल्वे, बेस्ट आणि मेट्रो या तिन्ही ठिकाणी चालेल अशी स्मार्ट कार्ड अथवा एक तिकीट योजना तयार करण्याबाबत विचार करा, असे महत्त्वपूर्ण निर्देशही हायकोर्टाने दिले. मुंबईत वाहनचालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळेही शहरात नियमित वाहतूक कोंडी होत असल्याचं यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. सिंगापूर तसेच जपानच्या धर्तीवर आपल्याकडे पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था का नाही? याचा सवालही हायकोर्टाने विचारला. मुंबईतील भूमीगत मेट्रोप्रमाणेच भूमीगत पार्किंग लॉट उभारता येईल का? अशी विचारणा यावेळी हायकोर्टाकडून करण्यात आली. सध्या बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या प्रत्येकालाच भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काही उपाय योजना असल्यास त्या पुढील सुनावणी वेळी मांडाव्यात अशा सूचनांचं स्वागतच आहे, असं म्हणत हायकोर्टाने शुक्रवारची सुनावणी तहकूब केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Maharashtra Live News Updates: दुष्काळाचा फटका, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा संघर्ष
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Embed widget