एक्स्प्लोर

रडवणारी हार्बर, रखडणारी लोकल, रोजचीच मर-मर!

नवी मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवातच अनेकदा हार्बरच्या तांत्रिक बिघाडाने होते.

मुंबई : हार्बर मार्गावरील लोकलचा खोळंबा ही नेहमीची परिस्थिती झाली आहे. किंबहुना, हार्बर सुरळीत आहे अशाच काहीशा बातम्या करण्याची वेळ आली आहे. हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन वेळेवर आल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हा मनस्ताप दररोजचा ठरलेला आहे. नवी मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवातच अनेकदा हार्बरच्या तांत्रिक बिघाडाने होते. पनवेल ते सीएसएमटी या 68 किमीच्या मार्गावर एकूण 25 स्थानकं आहेत. मात्र सर्वात मोठा त्रास कुर्ला ते पनवेल या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो. कुर्ला स्थानक हे मध्य रेल्वेवरील महत्वाचं स्थानक आहे. इथे सीएसएमटीहून आणि मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घाटकोपरहून येणारे प्रवासी असतात. कुर्ला स्थानकातली 7 आणि 8 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील गर्दी ही हार्बर मार्गावरची सर्वात भीषण समस्या आहे. इतर प्लॅटफॉर्म रिकामे असतानाही या प्लॅटफॉर्मवर गर्दी असते. कुर्ला स्थानकात ठरलेल्या वेळेपेक्षा लोकल तीन मिनिटेही उशिरा आली, तरी गर्दीचं रुपांतर महागर्दीत होतं. संध्याकाळच्या वेळेला डाऊन मार्गावर प्रवास करताना अशा घटना नेहमी घडतात. त्यात हार्बरचा काही तांत्रिक बिघाड झाल्यास नवी मुंबईच्या प्रवाशांना बिघाड दुरुस्त होण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. बऱ्याचदा पनवेल ते मानखुर्दपर्यंत गाडी सुरळीत येते, मात्र तिथून पुढे कुठे बिघाड होईल किंवा गती संथ होईल सांगता येत नाही. याचा प्रत्यय गेल्या काही आठवड्यांमधील घटनांतून आलाच आहे. हार्बर मार्गावर केवळ स्लो गाड्या चालतात. फास्ट लाईन नसल्यामुळे सर्व भार याच मार्गावर असतो. त्यात हा नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. पण एवढी गर्दी आणि दुर्लक्षित मार्ग असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. रेल्वे रुळाला तडे जाणं, ओव्हरहेड वायर तुटणं अशा तांत्रित समस्या अनेकदा उद्भवतात. हार्बर मार्गावरील तुमच्या समस्या सांगा तुम्ही जर हार्बर मार्गावरुन प्रवास करत असाल तर तुमच्या सुचना, समस्या आणि प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. (कमेंट लिहिण्यासाठी स्क्रोल डाऊन करा)

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा
राज ठाकरेंनी भावाकडं ज्ञान पाजळावं, शिवसेना भवनमधील फोटो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? 15 दिवसात तो फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा ठाकरेंना इशारा

व्हिडीओ

OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो

Embed widget