Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्याखुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या (NDA)उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा (Yashwant Sinha)? राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावणाऱ्या काँग्रेसच्या नितीन राऊत (NItin Raut)यांचं मत बाद करा, अशी मागणी भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी (Babanrao Lonikar) केली आहे. माझा नंबर आधी असताना नितीन राऊतांनी मतदान केलं असा आक्षेप लोणीकरांनी घेतला आहे. 


लोणीकर म्हणाले की, माझा पहिला नंबर होता. आम्ही एक तास रांगेत उभे राहिलो. नितीन राऊत हे अर्धा तास मध्ये जाऊन बसले. माझं मतदान पहिलं असताना राऊत यांनी पहिलं मतदान केलं. त्यांना मध्ये जाऊन बसता येत नाही. त्यामुळं त्यांचं मतदान रद्द करण्यात यावं अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे करणार आहे, असं लोणीकर म्हणाले. या संदर्भातील व्हि़डीओ फुटेज देखील आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 


भाजपच्या आमदारांनी साडेनऊ वाजेपासून मतदान करण्यासाठी हजेरी लावली होती. राऊत यांनी रांगेत मतदान न केल्याचा आरोप लोणीकरांकडून केला आहे. यावर आता आयोग काय निर्णय घेणार हे पाहणं आवश्यक आहे. 


200 पेक्षा जास्त आमदार अंतरात्म्याचा आवाज ऐकून द्रोपदी मुर्मु यांना मतदान करतील - सुधीर मुनगंटीवार 


मते फुटणार हा शब्दप्रयोग योग्य नाही. पार्टीच्या नेत्यांचा आदेश ऐकण्याऐवजी आज अंतरात्म्याचा आवाज ऐकला जाईल. 200 पेक्षा जास्त आमदार अंतरात्म्याचा आवाज ऐकून द्रोपदी मुर्मु यांना मतदान करतील, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बसमधून आमदार आणल्याच्या नाना पटोलेंच्या आरोपावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसचेही अनेक आमदार बसमधून आणले जातात. राजस्थानमध्ये  काँग्रेस आमदार बसमधून आणले जातात हे नानांना माहित नाही का?  नाना पटोलेंकरता केवळ टीका करणे हाच मोठा पराक्रम मानला जातोय, असा टोलाही त्यांनी लगावला.



या बातम्या देखील अवश्य वाचा