Presidential Election 2022 Live Updates : कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती, आज मतदान; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. याचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2022 04:01 PM
Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस मतदान; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीएला मतदान

Presidential Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे शहजील इस्लाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार एस. जडेजा, ओदिशामध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी मुर्मू यांना मतदान केले. 

Presidential Election 2022 : महाराष्ट्रात शिंदे गटातील 48 आमदारांनी बजावला राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाचा हक्क

 Presidential Election 2022  :  महाराष्ट्रात शिंदे गटातील 48 आमदारांनी बजावला राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाचा हक्क

Presidential Election 2022: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी बजावला मतदानाचा अधिकार

Presidential Election 2022:  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मतदानाचा अधिकार बजावला. डॉ. मनमोहन सिंह हे प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव व्हिलचेअरवरून संसदेत दाखल झाले आणि मतदानाचा अधिकार बजावला. 

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? कुणाचं पारडं जड? असं आहे मतांचं गणित

Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? क्लिक करा आणि जाणून घ्या मतांचं गणित कसं आहे...



 

Presidential Election 2022: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बजावला मतदानाचा हक्क

 Presidential Election 2022: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान

Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान


Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान

Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.  विधीमंडळातील मतदान केंद्रात मतदान केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीए उमेदवाराला 200 मते मिळणार असल्याचा दावा केला आहे. 

Presidential Election 2022 : 200 पेक्षा जास्त आमदार अंतरात्माचा आवाज ऐकून द्रोपदी मुर्मु यांना मतदान करतील; भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा 

Presidential Election 2022 : मते फुटणार हा शब्दप्रयोग योग्य नाही. पक्षाच्या नेत्यांचा आदेश ऐकण्याऐवजी आज अंतरात्माचा आवाज ऐकला जाणार आहे. दोनशेपेक्षा जास्त आमदार अंतरात्माचा आवाज ऐकून द्रोपदी मुर्मु यांना मतदान करतील असा दावा  भाजप नेते सुधीर मुनगंटीवार  यांनी केला. 

Presidential Election 2022: काँग्रेस आमदार नितीन राऊत यांचे मत बाद करावे, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

Presidential Election 2022 : काँग्रेस आमदार नितीन राऊत यांचे मतदान बाद करावं, तशी मागणी करणार असल्याचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले. नितीन राऊत हे मतदान करणाऱ्या सभागृहात अर्धा तास आधी कसे गेले हा माझा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. नियमांप्रमाणे माझा पहिला क्रमांक होता. मात्र, त्याआधी त्यांनी मतदान केले असे लोणीकर यांनी सांगितले. 

Presidential Election 2022: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदानासाठी विधीमंडळ परिसरात दाखल

Presidential Election 2022: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपती निवडणूक मतदानासाठी विधीमंडळ परिसरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 200 मते मिळणार असल्याचा दावा केला आहे. 

Presidential Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, संसदेत केले मतदान

Presidential Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. संसदेतील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले आहे.

Presidential Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, संसदेत केले मतदान

Presidential Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. संसदेतील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले आहे.

Presidential Election 2022: राज्यात राष्ट्रपती निवडणूक मतदानाला सुरुवात, काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केलं पहिलं मतदान

Presidential Election 2022: राज्यात राष्ट्रपती निवडणूक मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी पहिलं मतदान केलं आहे. 

Presidential Election 2022: काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले आमदार सांभाळावेत, भाजप नेते गिरीष महाजन यांचे वक्तव्य

Presidential Election 2022: राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत जे चित्र दिसले तेच  पुन्हा या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले आमदार सांभाळावेत असे भाजप नेते गिरीष महाजन यांनी सांगितले. 

Presidential Election 2022: युपीएचे सर्व आमदार यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत दिलीप वळसे पाटील

Presidential Election 2022: युपीएचे सर्व आमदार यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील. एनडीए उमेदवाराला 200 मते पडतील हा दावा म्हणजे त्यांची आकडेमोड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 

Presidential Election 2022: भाजपला मते फुटण्याची भीती, त्यामुळे आमदारांना बसमधून आणले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Presidential Election 2022:  भाजपला मते फुटण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारांना बसमधून आणले जात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. 

Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा विजय निश्चित, राज्यातून विक्रमी मते मिळतील: भाजप नेते आशिष शेलार

Presidential Election 2022 : राज्यात महाविकास आघाडीचे अस्तित्वच दिसत नाही. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांचा विजय निश्चित असून राज्यातून विक्रमी मते त्यांना मिळेल असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 


 

पार्श्वभूमी

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये मतदानासाठी 6 बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी असेल. वेगवेगळ्या राज्यांचे नऊ आमदार संसद भवनामध्ये मतदान करतील, यामध्ये उत्तर प्रदेशमधील 4, त्रिपुरामधील 2, आसाममधील एक, ओडिशामधील एक आणि हरयाणातील एका आमदाराचा समावेश आहे. तर  42 खासदार विधानसभेत मतदान करतील.










 









एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 2015 ते 2021 याकाळात झारखंडच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळली.


एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड 
महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यास राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या महिल्या आदिवासी महिला ठरतील.


यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार
यशवंत सिन्हा यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.