एक्स्प्लोर

तावडे-शेलारांनी विरोधी पक्षातील मराठा आमदार मॅनेज केले?

राष्ट्रपती निवडणुकीत विरोधीपक्षाचे आमदार फोडण्यात भाजप नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत विरोधीपक्षाचे आमदार फोडण्यात भाजप नेते आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह विरोधीपक्षातील आमदारांची मतं फुटल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट झालं. भाजप आमदार आशिष शेलार आणि विनोद तावडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा आमदारांना मॅनेज केल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांनी पुण्यातील एक आणि नगरमधील दोन विरोधी आमदारांना राष्ट्रपती निवडणुकीत आपल्या बाजूने वळवल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. पुण्यात बैठक? राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी आमदार फोडण्यासाठी आशिष शेलार यांनी पुण्यात बैठक घेतली. आशिष शेलार यांनी पुण्यात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या चार आमदारांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.  त्यांनी चार आमदारांना आपल्या बाजूने वळवलं, असं सांगण्यात येत आहे. सत्यजीत तांबेंचा दावा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार फुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. “मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 2 विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. धक्कादायक!”, असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं. विरोधकांच्या मतांचं गणित दुसरीकडे विरोधकांची मतं फुटल्यानं ते धास्तीत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून 6 मतं फुटलीत, तर इतर 8 विरोधकांनीही भाजपला मतदान केलं आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नेमकी कुणाची मतं फुटली, याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मीरा कुमार यांना एकूण 77 मतं पडली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर नजर टाकल्यास, या दोन्ही पक्षांचे एकूण 83 आमदार आहेत. म्हणजे ही सगळी मतं मीरा कुमार यांना पडणं अपेक्षित होतं. दुसरीकडे एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, माकप, सपा या पक्षांची एकूण 5 मतं ही मीरा कुमार यांच्याकडे झुकली असण्याची शक्यता अधिक आहे. आता या पाच पक्षांची मतं मीरा कुमार यांना मिळाली असतील, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूण 11 मतं फुटली असा त्याचा अर्थ निघतो. दरम्यान, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले आमदार रमेश कदम यांनी मतदानाच्या दिवशीच जाहीर केलं होतं की, ते रामनाथ कोविंद यांना मतदान करतील. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराने रामनाथ कोविंद यांना मत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. संबंधित बातम्या  राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली! 

कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत? रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
Sandeep Deshpande: 'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर
'हट्ट करू नका, 'इनोव्हा' मिळेल!' गाड्यांच्या मागणीवरून मनसेनं पालिका सत्ताधाऱ्यांना पाठवलं गिफ्ट; संदीप देशपांडेंनी 'इनोव्हा' केल्या कुरिअर

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
बायकोसोबत मित्राचे संबंध; संशयाचं भूत मनात शिरलं, सोबत राहणाऱ्या मित्राला संपवलं, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Mallikarjun Kharge : प्रधानांचा राजीनामा घेऊन मोदींनी खुर्ची वाचवली, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जसाठी अमित शाहांनी राजीनामा द्यावा : मल्लिकार्जुन खरगे
अमित शाहांनी राजीनामा द्यावा, ते देत नसतील तर मोदींनी त्यांना हटवावं: मल्लिकार्जुन खरगे
Kalyan Court Summons Uddhav Thackeray And Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदेंनाही कल्याण कोर्टाने समन्स धाडलं; दोघांनाही हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
मुंबई महापालिकेतील जलमापक सुपरवायजरला 40 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
OTT Trending Movie: 100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
100 कोटींच्या पौराणिक चित्रपटाचा OTTवर दबदबा;  'बॉक्स ऑफिसवर अपयशी, आता मिळवतोय प्रेक्षकांची पसंती
Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; विदर्भातही मुसळधार पाऊस, सिपना नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
Embed widget