एक्स्प्लोर

एमपी मिल प्रकरण : प्रकाश मेहतांच्या भूमिकेवर लोकायुक्तांचे ताशेरे, मेहता म्हणतात..

बातमीच्या सूत्रांच्या मागे कोणी सुत्रधार असल्याची शंका येत असल्याचा आरोपही केला आहे.

मुंबई : एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत लोकयुक्तांनी एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढले आहेत. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं सांगत प्रकाश मेहतांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच या बातमीच्या सूत्रांच्या मागे कोणी सुत्रधार असल्याची शंका येत असल्याचा आरोपही केला आहे. एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावर प्रकाश मेहतांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “अहवाल आला आणि त्यात माझ्या विरोधात काही लिहिलेलं असेल, हे खरं असेल तरच यावर मी भाष्य करु शकेन” असं म्हणत सूत्रांची माहिती किती खरी हे तपासावं लागेल असंही प्रकाश मेहतांनी ‘माझा’शी बोलताना स्पष्ट केलं. आता विरोधी पक्षांना काही काम उरलेलं नाही. विरोधी पक्षांनी आधी सूत्रांची माहिती पक्की करावी मग आपली भूमिका बजावावी. फक्त विरोधासाठी विरोध करणे त्यांना शोभा देत नाही असं म्हणत विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. विरोधकांसारखी आमच्या पक्षात संस्कृती नाही. पक्षावर संशय करणं म्हणजे मी स्वतःवर संशय करण्यासारखं आहे, असंही मेहता पुढे म्हणाले. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री आणि पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही प्रकाश मेहतांनी स्पष्ट केलं आहे. लोकायुक्तांचा नेमका ठपका काय? एमपी मिल कंपाऊंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करत लोकयुक्तांनी एम. एल. तहलियानी यांनी ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात प्रकाश मेहतांचा कारभार पारदर्शी नाही, असा लोकायुक्तांचा अहवाल सादर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच लोकायुक्तांचा हा अहवाल आणि त्यावर राज्य सरकारने केलेली कारवाई हा मुद्दा आगामी पावसाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय लागू होण्याआधीच त्याला स्थगिती दिली. मात्र या निर्णय प्रक्रियेत आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन विकासकाच्या फायद्यासाठी मंत्रीमहोदयांनी निर्णय घेतल्याचं मतही लोकायुक्तांनी व्यक्त केलं आहे. "मुख्यंत्र्यांना याबाबतची कल्पना नव्हती, फाईलवर चुकून तसा शेरा मारण्यात आला," अशी कबुली प्रकाश मेहता यांनी लोकायुक्तांकडे दिली आहे. प्रकाश मेहतांवर आरोप काय? मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर करण्यात आला होता. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप आहे. 3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता. पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

संबंधित बातम्या :

एमपी मिल प्रकरणात मुख्यमंत्री चौकशीला सामोरे जाणार : सूत्र

प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करणार : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री ‘माझा’च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget