एक्स्प्लोर

Powai Hostage Crisis: रोहित आर्यचे पैसे दीपक केसरकरांनी का थकवले? ओलीस ठेवण्याची वेळ का आली? नेमका काय होता प्रोजेक्ट?

Powai Hostage Crisis: मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी २० कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र सरकार पैसे देत नसल्याने त्याने यापूर्वी आझाद मैदानावर उपोषणही केले होते.

मुंबई: मुंबईच्या पवईमधील ओलिस नाट्यप्रकरणी (Powai Hostage) आरोपी रोहित आर्य (Rohit Arya) याच्याविषयी नवी माहिती समोर आली आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाअंतर्गत ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर’ या प्रकल्पाचे तो संचालक होता. ‘शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्याने ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले’, असा दावा रोहित आर्यने केला होता. या प्रकरणी त्याने तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेऊनही फायदा झाला नसल्याचे म्हटले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी २० कोटी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र सरकार पैसे देत नसल्याने त्याने यापूर्वी आझाद मैदानावर उपोषणही केले होते. सततच्या तणावातून तो उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे. 

मुंबईतील पवईतील ओलीस प्रकरणातील आरोपी संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यने उपोषण केलं होतं. स्वच्छता मॉनिटर अभियानात सरकारने पैसे थकवल्याचा आरोप रोहित आर्यने केला होता 12 जानेवारी 2024 रोजी शासन आदेश काढून रोहित आर्यची प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाच्या प्रकल्पाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी 20 कोटी 63 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी प्रोजेक्ट लेट्स अंतर्गत रोहित आर्यवर होती. 

रोहित आर्यच्या मागण्या काय होत्या? (Rohit arya project investent)

- शालेय शिक्षण विभागाने स्वच्छता मॉनिटर अभियान गुंडाळल्याने नुकसान झाल्याचा दावा रोहित आर्याने केला होता. 
- 45 लाख रुपये बुडवल्याचा रोहितचा आरोप होता. 
- रोहित आर्याने काही दिवसांपूर्वी आझाद मैदानातही उपोषण केलं होतं. 
- तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊनही फायदा न झाल्याचा दावा आर्याने केला होता. 
- काही दिवसांपासून तणावात असल्याने उपचार घेत असल्याची माहिती आहे.

रोहित आर्याने दिपक केसरकरांच्या बंगल्याबाहेर केलं होतं आंदोलन (Rohit arya project investent)

काही दिवसांपूर्वी माजी शालेय मंत्री दिपक केसरकर यांच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. रोहीत आर्य हा नागपूरच्या शाळेत प्राध्यपक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने नागपूरमध्ये एक स्वच्छता मोहीम राबवली होती. त्यावेळीच्या शालेयमंत्री दिपक केसरकर यांनी हा निधी त्याला त्यावेळी दिला नाही. त्याने स्वखर्चाने ६० ते ७० लाख रुपये खर्च केला होता. हा निधी न मिळाल्याने रोहित आर्याने आंदोलन केलं होतं. दीपक केसरकर यांच्या शासकीय बंगल्याबाहेर त्याने आंदोलन केलं होतं. एवढंच नाहीतर रोहित आर्यने आझाद मैदानात देखील आंदोलन केलं होतं.

कोण आहे रोहित आर्य (Who is rohit arya)

रोहित आर्य हा मुंबई पवई परिसरात एक्टींग क्लासेस आणि ऑडिशनसंदर्भातील काम करतो. सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटीव्हेशन स्पीकर अशी सांगतो. 'अप्सरा' नावाने त्याचे युट्यूब चॅनेल आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असून आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

रोहितचे एका प्रोजेक्टमध्ये गुंतले पैसे (Rohit arya project investent)

रोहित आर्य मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, सरकारकडे त्याचे पैसे आहेत, त्याने लोन काढून शिक्षण विभागासाठी एक प्रोजेक्ट केला होता. स्वच्छता मॉनिटरसंदर्भातील या प्रोजेक्टसाठी त्याचे पैसे लागले असून सरकारने त्याचे पैसे न दिल्याने कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

नेमका प्रकार काय?

पवईच्या महावीर क्लासिक बिल्डिंगमील RA स्टूडिओमध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून सिनेमा, वेब सीरीजसाठी कास्टिंग केले जात होते. त्यासाठी, 17 जणांचे फाइनल कास्टिंग झाले. त्यामुळेच, येथील स्टुडिओत आज 17 मुले आणि दोन पालक उपस्थित होते. दुपारी जेवणाच्या वेळेत ही मुले स्टुडिओतून बाहेर गेल्यानंतर पालक चिंतेत होते. कारण, ही मुले काचेतून आपला हात दाखवत इशारा करत होती. दरम्यान, घटनास्थळी पोलीस आल्यानंतरच हा किडनॅपिंगचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर
BMC Election Result Shivsena vs UBT Shivsna : फोडाफोडीचे डाव की सत्तास्थापनेचा पेच?
PM Narendra Modi On BJP Mumbai Win : मुंबईत भाजपला रेकॉर्डब्रेक जनमत, नरेंद्र मोदींकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली
Embed widget