एक्स्प्लोर

व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सशर्त जामीन मंजूर, ICICI बँक बेहिशेबी कर्जवाटप प्रकरण

आयसीआयसीआय बँकनं केलेल्या बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना 5 लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बँकनं केलेल्या बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांना 5 लाखांच्या वैयक्तिक जातमुचालक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

याप्रकरणी वेणुगोपाल धूत यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. या अर्जाची दखल घेत त्यांना पाच लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. त्यांनी ईडीला तपासात पूर्ण सहकार्य करावे, चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर ते बोलावतील तेव्हा हजर राहावे, देश सोडून जाऊ नये आणि पासपोर्ट पोलिसांकडे जमा करणे अशा अटीशर्तीवर हा जामीन मंजूर केला आहे. 

आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन कंपनीला 300 कोटींचे कर्ज दिलं होतं. 7 सप्टेंबर 2009 रोजी या कर्जाचा परतावा करण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 8 सप्टेंबर 2009 रोजी या रकमेतील 64 कोटींची रक्कम 'नुपॉवर रिन्युएबल्स' या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजमधीलच एका कंपनीला देण्यात आली होती. याच प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आयआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन ग्रुप प्रमोटर वेणुगोपाल धूत यांना नोटीस पाठवली होती. चंदा कोचर व वेणूगोपाल धूत यांच्या नावे कोर्टानं वॉरंट जारी केलं होतं. गेल्या सुनावणीत चंदा कोचर यांनी कोर्टात हजर राहत जामीन मिळवला होता. मात्र दिपक कोचर हे अजूनही जेलमध्येच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी बोलणार
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी बोलणार
Eknath Shinde: एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
एका डोळ्यात आनंद आणि एका डोळ्यात अश्रू,अजितदादांची जयंती अन् देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
वकील सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, “जंतर-मंतरवर आंदोलन सुरूय, पोलीस अत्यंत अमानुष कारवाई करत आहेत” सरन्यायाधीश म्हणाले, “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला व्हिडिओंमध्ये अजिबात रस नाही, पाहायला वेळ नाही”
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी बोलणार
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय सरकार गंभीरतेनं घेत नाही; उद्धव ठाकरेंचा नवा प्लॅन, राहुल गांधींशी बोलणार
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
'लेकीबाळींचे कपडे फाडण्याचा अधिकार कोणी दिला?' अखिलेश यादवांचा सवाल, विरोधकांचा संसदेत एल्गार, काल रस्त्यावर संघर्ष केल्यानंतर आज राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार काळ्या पोशाखात संसदेत
Delhi Viral video: तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
तरुणीच्या हाताला धरलं, नको त्या जागेवर मुद्दाम काठीचा फटका मारला अन् दुसऱ्याकडे बघून हसला; दिल्ली पोलिसांच्या विकृतीचा पुरावा समोर
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
Manoj Jarange Patil at Jantar Mantar: मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, मी हिंदीत बोललो तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
मनोज जरांगेंना जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा हिंदीत बोलायला आग्रह, जरांगे पाटील म्हणाले, 'माझी हिंदी ऐकाल तर तुम्ही तुमची हिंदी विसराल'
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
इकडं पश्चिम बंगालमधील तब्बल 2 हजार सीआरपीएफ जवान थेट दिल्लीला एअरलिफ्ट, गृह मंत्रायलाचा आदेश अन् तिकडं जंतर मंतर सोडणार नसल्याचा काॅकरोच जनता पार्टीचा एल्गार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, गेल्या 12 वर्षात साचलेला असंतोष उफाळून बाहेर पडतोय; दिल्लीतून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर सडकून प्रहार
Embed widget