एक्स्प्लोर

पीएमसी बँक घोटाळा | पीएमएल अंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यासाठी हवा आरोपींचा ताबा : ईडी

ईडीने आतापर्यंत सुमारे 3800 कोटी रुपयांची मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. हा ताबा मिळण्याबाबत इतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.

मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि एचडीआयएलचे संचालक राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान या पितापुत्रांना बुधवारी किल्ला कोर्टानं 23 ऑक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आहे. दरम्यान ईडीनं या प्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींचा ताबा मिळावा यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
एचडीआयएलचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचा ताबा मिळावा, अशी मागणी या अर्जामध्ये करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन्ही आरोपींचा ताबा मिळावा, असं या अर्जामध्ये म्हटले आहे. ईडीने आतापर्यंत सुमारे 3800 कोटी रुपयांची मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. हा ताबा मिळण्याबाबत इतर कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडीला दिले आहेत.
पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या चार हजार 335 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू)नं बँकेचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि एचडीआयलचे संचालक राकेश वाधवान आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान या पिता पुत्रांना अटक केली आहे. त्यांना मुंबईतील किल्ला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एस. जी. शेख यांनी त्यांना 23 ऑक्टोक्टोंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या तीन आरोपींव्यतिरिक्त याप्रकरणी ईओडब्ल्यूने बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जोय थॉमस यांनाही अटक केलेली आहे. त्यांना दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत 17 ऑक्टोबरला संपणार आहे.
बुधवारीही सुनावणीदरम्यान, पीएमसी बँकेचे शेकडो ठेवीदार, फलक घेऊन दक्षिण मुंबईतील किल्ला कोर्टाच्या आवारबाहेर जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने  केली.  11,000 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या या बँकेत घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिर्झव्ह बँकेने गेल्या महिन्यात त्यावर प्रशासक नेमून पैस काढण्यास खातेधारकांना मर्यादा घालून दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget