मुंबई : क्रीडा क्षेत्रात भारत चांगलीच प्रगती करत असून 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या (Olympic) यजमानपदाच्या शर्यतीत भारत असेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  (PM Narendra Modi) केली. भारताला यजमानपदाची संधी मिळाली तर आयोजनात भारत कुठलीच कसर ठेवणार नाही असं मोदी म्हणाले.  आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) 141 व्या अधिवेशनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेद्र मोदींच्या हस्ते पार पडलं. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमाला अनेक देशातील क्रीडा प्रतिनिधी उपस्थित होते. तसंच अनेक भारतीय खेळाडू आणि चित्रपट कलाकार देखील आवर्जून हजर होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic Committee) बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले. 40 वर्षांनंतर भारतात आयओसी सत्र आयोजित करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.


पाकिस्तानविरुद्धच्या या ऐतिहासिक विजयासाठी मी टीम इंडिया आणि सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले. भारताने अतिशय नेत्रदीपक विजय मिळवला आहे. खेळ हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यात गेलात तर प्रत्येक सण खेळाशिवाय अपूर्ण असल्याचे लक्षात येईल. आम्ही भारतीय केवळ क्रीडाप्रेमी नाही तर क्रीडाप्रेमीही आहोत असं ते म्हणाले.


भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी उत्सुक 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भारत आपल्या देशात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, हे 140 कोटी भारतीयांचे जुने स्वप्न आहे."


खेळात कुणी लूजर नसतो, जिंकणारा आणि शिकणारा असतो


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे आयोजन होतंय. काही वेळेपूर्वी भारताने अहमदाबा मध्ये देशातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर विजय मिळवला. मी या विजयाबद्दल संघाचं आभार मानतो. खेळात कोणी लूजर नसतो तर जिकणारा आणि शिकणारा असतो. रेकॉर्ड केला तरी त्याचे स्वागत केलं जातं. आमचे सरकार खेळाला महत्व देण्यासाठी काम करत आहे. 


खेळ जगाला जोडण्याचं सशक्त माध्यम 


आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर चागली कामगिरी करत आहे. तरुणांनी देखील चांगली कामगिरी केलीय. मला विश्वास आहे भारताला आयओसीचे सहकार्य मिळेल. खेळ फक्त मेडल जिकण्यासाठी नसतात तर त्या माध्यमातून सर्वांची मने जिकता येतात. खेळ जगाला जोडण्याचे एक सशक्त माध्यम आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस


आपल्या संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, "आयओसी कार्यकारी मंडळाने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केल्याचे ऐकून सर्वांना आनंद झाला आहे. आशा आहे की लवकरच आम्हाला या संदर्भात काही सकारात्मक बातमी मिळेल."


ही बातमी वाचा: