मुंबई : ऑनलाईन रमी हा कौशल्याचा खेळ कसा? असा सवाल करत हायकोर्टानं राज्य सरकारसह जंगली रमी व रमी सर्कलला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन रमीवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सोलापुरातील सानाजिक कार्यकर्ती गणेश ननावरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या ऑनलाईन गेमिंग अैप्सवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. 


या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच या दोन्ही गेमिंग कंपन्यात वारंवार पत्रव्यवहार करून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ही याचिका दाखल करण्यात आल्याचं याचिकेतून स्पष्ट करण्यात आलंय. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. ऑनलाईन रमी हा संधीचा खेळ नसून कौशल्याचा खेळ आहे याचा खुलासा होणं आवश्यक आहे, असं निरीक्षण नोंदवत यावरील सुनावणी 16 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे.


काय आहे प्रकरण?


ऑनलाईन रमी हा एक जुगार असून यानं तरुणाईला व्यसन लावलं आहे. त्यात मोठमोठे सेलिब्रेटी ऑनलाईन रमीची खुलेआम जाहिरात करतात. त्यामुळे त्यांचे चाहते या खेळाकडे आकर्षित होतात. मात्र ऑनलाईन रमीमुळे अनेकांचं मोठ आर्थिक नुकसान झालेलं आहे. निराशेच्या भरात नुकसानामुळे काही जणांनी आत्महत्याही केल्या आहेत. त्यामुळे तरूणाईला विनाशाकडे नेणा-या या जुगारावर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: