मुंबई : 'काईंडनेस अनलिमिटेड' (Kindness Unlimited) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 'द काईंडनेस जाम' (The Kindness Jam)  या मनोरंजन कार्यक्रमाचे 15 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सेवाभावी वृत्तीने, समाजहिताच्या दृष्टीने जे तरूण काम करतात त्यांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मुंबईतील रहिवासी असलेले तरूण यामध्ये सहभागी होऊ शकतात. Connect For आणि Schbang यांच्यासह इतर 40 अशासकीय संस्थांच्या सहकार्याने मुंबईत सामाजिक सेवेची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी नावनोंदणी (The Kindness Jam 2024 Registration) सुरू झालं आहे.


हा कार्यक्रम अन्य कार्यक्रमांसारखा नसून ज्या तरुणांनी सेवाभावी वृत्तीने, समाजहिताच्या दृष्टीने योगदान दिले आहे अशाच तरुण-तरुणींना विनाशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी संगीतमय संध्येसह इतरही मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. 


सदरचा कार्यक्रम शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वांद्रे पश्चिम येथील सेंट अँड्र्यूज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्टँड अप कॉमेडियन आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर अबीश मॅथ्यू , चित्रपट दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, अफलॅटुन्स आणि Hormuz Ragina our Jam master इत्यादी कलावंतांची उपस्थिती असणार आहे. 


स्वयंसेवी संस्थांकडून काय काम केलं जातं? 


मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, शाळांची रंगरंगोटी करून विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी वातावरण निर्माण करणे, वृद्धाश्रमात जाऊन त्या ठिकाणच्या वृद्धांसोबत वेळ घालवणे, जेणेकरून त्यांचा एकाकीपणा कमी व्हावा. लहान मुलांचं सक्षमीकरण करणे, वृक्षलागवड करणे असे कार्यक्रम स्वयंसेवी संस्थांकडून राबवण्यात येत आहेत. 


उपक्रमासाठी नावनोंदणी सुरू


मुंबईचे रहिवासी असलेले स्वयंसेवक या उपक्रमात सहभाग नोंदवू शकतात. 20 सप्टेंबरपासून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू झाली आहे. 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या स्वयंसेवकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 45 दिवसांचा असून त्यामध्ये वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये सहभाग नोंदवणाऱ्या स्वयंसेवकांना आणि कार्यक्रम राबवणाऱ्या संस्थांनाही त्याचा फायदा होणार आहे.


या पूर्वी 2019 साली, कोविड काळापूर्वी काईंडनेस जाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक करूणा आठवडा साजरा करण्यात येत होता. त्या दरम्यान 13 नोव्हेंबर 2019 रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2019 साली जवळपास 1200 हून जास्त स्वयंसेवकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यापैकी काईंडनेस जाम या कार्यक्रमाचे 800 तिकीट वितरित करण्यात आले होते. त्यावेळी अंकुर तिवारी आणि तन्मय भट्ट यांच्यासह 10 प्रमुख व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता. 


यंदाच्या वर्षी त्यापेक्षा अधिक स्वयंसेवक भाग घेण्याची शक्यता आहे. त्यापैकी ज्या स्वयंसेवकांनी जास्तीत जास्त तास सेवा दिली आहे त्यांना यंदाच्या काईंडनेस जाम या कार्यक्रमासाठी प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये किमान 10 तासांची सेवा अपेक्षित आहे. तर यंदाच्या कार्यक्रमासाठीही 800 तिकीटांचे वितरण करण्यात येणार आहे. 


असे असतील स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम


29 सप्टेंबर 2024 : पाम बीचवरील मॅन्ग्रुव्ह स्वच्छता मोहीम, नवी मुंबई (Mangrove Clean Up Drive) 


2 ऑक्टोबर  महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम , दादर आणि नवी मुंबई


3 ऑक्टोबर  भाषा ब्रिगेड , भविष्यासाठी भाषांतर , झूम मिटिंगच्या माध्यमातून


5 ऑक्टोबर स्प्लॅश आर्ट कॉम्पिटिशन नवरात्री थीम, परेल मुंबई


5 ऑक्टोबर स्प्लॅश आर्ट कॉम्पिटिशन दिवाळी थीम, वेल्लामदाई, तामिळनाडू


7 ऑक्टोबर   इकोक्राफ्ट, किएटिंग प्लॅन्टर्स,


12 ऑक्टोबर आर्टशाळा , शाळांची रंगरंगोटी,  वडाळा मुंबई


19 ऑक्टोबर  दिया पेंटिंग NADE , विक्रोळी मुंबई


20 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिकांसोबत सेशन, माझगाव मुंबई


27 ऑक्टोबर ऑडिओबुक रेकॉर्डिंग