एक्स्प्लोर

राज्यभरात बेकायदेशीर 'पेट्स शॉप्स'चा सुळसुळाट, वैध परवानाधारक दुकानांचा तपशील द्या : हायकोर्ट

 राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या कायदेशीर पाळीव प्राण्यांच्या दुकानांचा तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं (Bombay High Court) राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबई :  राज्यात सध्या उपलब्ध असलेल्या कायदेशीर पाळीव प्राण्यांच्या दुकानांचा तपशील सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. राज्यात सध्या बेकायदेशीररीपणे सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या (पेट शॉप) सुळसुळाट झाला असून अश्या असंख्य दुकानांबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे.

राज्यभरात बेकायदेशीपणे सुरू असलेल्या पेट शॉप्सवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका शिवराज पाटणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. साल 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पाळीव प्राण्यांच्या दुकानांवर बंदी आणण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही असंख्य पाळीव प्राण्यांसाठीची दुकानं आवश्यक परवान्यांशिवाय सुरु असल्याची बाब याचिकाकर्त्यांच्यावतीनं अॅड. संजुक्ता डे यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली.

तसेच आपण स्वतः मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कुर्लातील पाळीव प्राण्यांच्या दुकानात भेट दिली असून तिथे अद्यापही खुलेआम विदेशी पक्षी आणि प्रतिबंधित प्राण्यांच्या प्रजातींची पिल्ले विकली जात असल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. प्राणी क्रुरता प्रतिबंधित कायदा, 1960 मधील तरतूदींनुसार, पाळीव प्राण्यांची दुकाने चालविण्यासाठी अनेकजण योग्य परवान्यांसाठी अर्ज करत नसल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केला.

कायद्यातील तरतूदींनुसार, पाळीव प्राणी आस्थापनांच्या नोंदणीसाठी रितसर अर्ज करणं आवश्यक आहे, आणि मंडळाचं समाधान झाल्यानंतरच त्यांना नोंदणीचं प्रमाणपत्र दिलं जाईल असही कायदा सांगतो. त्यामुळे याचिकेत उपस्थित करण्यात आलेला मुद्दा गंभीर असून राज्य प्राणी कल्याण मंडळालाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश देत राज्याच्या पशु कल्याण मंडळाला नोंदणीकृत आणि नियमांनुसार कार्यरत असलेल्या पाळीव प्राण्यांच्या दुकानांच्या संख्येबद्दल माहिती देण्याचे निर्देश जारी करत हायकोर्टानं सुनावणी 30 ऑगस्टपर्यंत तहकूब केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget