एक्स्प्लोर

Picnic Spot Mumbai : मुंबईकरांनो पिकनिकला जायचा बेत आखताय? हे आठ पर्याय आहेत बेस्ट

Picnic Spot Mumbai : कोण कुटुंबासोबत तर कोण मित्र-मैत्रिणींसोबत सहलाचा बेत आखतात. म्हणजेच काय तर.... पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.

Picnic Spot Mumbai : पुढील एक दोन दिवसांत मुंबई, पुण्यासह राज्यभर जोरदार पावसाचा अंदार वर्तवण्यात आलाय. काही दिवसांत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळेल. त्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणं आणखी बहरुन जातील. त्यात पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण सहलीचं नियोजन करतो.. कोण कुटुंबासोबत तर कोण मित्र-मैत्रिणींसोबत सहलाचा बेत आखतात. म्हणजेच काय तर.... पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. त्यासाठी मग गुगलवर जवळच्या जागेचा शोध घेतला जातो.. अथवा सहकाऱ्यांना विचारणा केली जाते... तुमचं हेच टेन्शन कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.. मुंबईजवळ पावसाळ्यात फिरायला फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची माहिती देणार आहोत... तुम्ही एक-दोन दिवसाच्या सुट्टीत सहलीचा आनंद घेऊ शकता...

पावसाळा सुरु झाला की,  डोंगराळ भागातील नद्या, धरणे, धबधबे, डोंगररांगा, दऱ्या खोऱ्यांनी हिरवी शाल अंगावर ओढलेली असते. निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहून मनाला एक प्रसन्नता मिळते. धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा आनंद लुटायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळे पावसाळ्यात  फिरायला जातात. या पावसाळ्याच तुम्ही देखील फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर तुम्हाला काही ठिकाणाची माहिती देणार आहोत. आज आपण जाणून घेऊया मुंबई जवळ असलेल्या पाच पिकनिक स्पॉटविषयी

माथेरान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. हे मुंबईपासून जवळ असलेले पर्यटन स्थळ आहे. माथेरानचे निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. पावसाळयात माथेरानचे जंगल पालथे घालणे एक अविस्मरणीय अनुभव असतो. माथेरान मुंबईपासून 100 तर पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. 

संजय गांधी नॅशनल पार्क
बोरिलीमधील संजय गांधी नॅशनल पार्क हे सहलीसाठी असलेले एक उत्तम ठिकाण आहे.  मुंबई पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पावसाळयात एक वेगळा अनुभव मिळतो. वेगवेगळया प्रकारची झाडे, वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे.  

गोराई
गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.  बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता.  बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते.  

खंडाळा आणि लोणावळा -
लोणावळा आणि खंडाळा भारतातील प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे. मुंबई-पुण्यात पासून जवळ असल्याने विकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.  या ठिकाणी उंच डोंगररांगा, धबधबे विपुल वनसंपदा किल्ले लेणी थंड हवा यासारख्या नैसर्गिक साधन संपत्ती बरोबरच मनोरंजन पार्क थीम पार्क कॅम्पिंग पॅराग्लायडिंग बंजी जंपिंग यासारख्या ऍक्टिव्हिटीमुळे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.

येऊर - 
येऊर  हे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे. पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची तुम्हाला आवड असेल तर एकदा येऊरला नक्की भेट द्या.  छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो. 

कर्जत - 
पावसाळ्यात विलोभनीय धबधबे शिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहणारं पाणी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतं. त्याशिवाय येते अनेक रिसॉर्टही आहेत. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांना हा उत्तर पर्याय असू शकतो.

अलिबाग - 
अलिबागमध्ये अनेक समुद्र किनारे आहेत. त्यामुळे हा परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलाय. एक दिवसाच्या पिकनिकसाठी मुंबईकरांसाठी हा बेस्ट पर्याय आहे. 

चिंचोटी - 
पावसाळयात धबधब्याला तरुणाईची विशेष पसंती असते. कडेकपारीतून कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहण्यात एक वेगळी मजा येते. पावसाळयात मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चिंचोटी धबधब्याकडे तरुणाईची पावले वळतात. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी गर्द हिरव्यागार झाडीतून मार्ग काढावा लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget