Phone tapping case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची दोन तास चौकशी
Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या.
Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुल्का (Rashmi Shukla) यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तब्बल दोन तास त्या कुलाबा पोलीस ठाण्यात होत्या. रश्मी शुल्का सकाळी 11 वाजता आपल्या वकिलासोबत कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिल्या. दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात ( Colaba Police Station ) टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याप्रकरणी रश्मी शुल्का आज कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिल्या.
दरम्यान, आपल्याविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हा खोटा आणि राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावा करून शुक्ला यांनी अटकेपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर एक एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने कुलाबा पोलिसांना दिले होते.
बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप –
रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता. याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.