एक्स्प्लोर
Advertisement
इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात : मुख्यमंत्री
"मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे."
मुंबई : मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. "उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला," असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
"मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे. कारण भाषा माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचं माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणं चुकीचे आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे." असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना निशाणा करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करत, असंही मुख्यमंत्री म्हणाले. हिंदी विद्या प्रचार समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाला गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार नसीम खान, आमदार राम कदम, माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह इत्यादी सर्व पक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. घाटकोपर पश्चिममधील हिंदी हायस्कूलच्या बैजनाथ साबू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या :
मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रूझमधील फेरीवाले हटवले
नवी मुंबईत मनसेचा राडा, वाशी स्टेशनबाहेरील फेरीवाले हटवले
दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक
विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?
मनसे-रिपाइंच्या सभा मोठ्या होतात, पण मतं मिळत नाहीत : आठवले
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement