Mumbai Teacher Recruitment : मुंबई महापालिकेच्या शाळेत पवित्र पोर्टल (Pavitra Portal Teacher Recruitment) प्रक्रियेतून निवड होऊनसुद्धा 400 शिक्षक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यापासून नियुक्ती मिळत नसल्याने  महापालिकेच्या  शिक्षणाधिकार्यालयाच्या समोर  शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आहे.


मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली होती. या प्रक्रियेत निवड होऊनसुद्धा मागील पाच महिन्यापासून नियुक्ती होत नसलेल्या शिक्षकांनी करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केलं. 


पात्र उमेदवारांची दुसरी यादी अद्याप प्रतीक्षेत


राज्य शासनाकडून 25 फेब्रुवारी रोजी पवित्र प्रणाली निवड प्रक्रियेतून उमेदवारांची निवड मुंबई महापालिका शाळांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून जवळपास चार महिन्यानंतर 798 पैकी फक्त 373 उमेदवारांची पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र इतर उमेदवारांची पाच महिन्यानंतरही पात्रता यादी जाहीर झालेली नाही. 


प्रशासनाकडून रिक्रुटमेंट  रूल्सचे कारण देत उर्वरित उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचं या उमेदवारांचे म्हणणं आहे. मेरिटनुसार एकत्रित नियुक्ती का करण्यात आली नाही? हा प्रश्न उमेदवाराकडून विचारला जात आहे. त्यामुळे या यादीतून पात्र ठरलेले आणि निवड झालेले सर्व शिक्षक उमेदवार शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसले आहेत.


मुंबई महानगरपालिका येथे 798 जणांची शिक्षण सेवक पदावर शिफारस निवड करण्यात आलेली असून शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. पण त्यापैकी केवळ 373 उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.   


राज्यात अनेक जिल्हा परिषदा असतील किंवा नगरपालिका, महानगरपालिका असतील, त्या-त्या ठिकाणी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे हे जाहीर करण्यात आलंय. मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या उमेदवारांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे. बाकी प्रक्रिया मात्र अपूर्णच राहिल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा: