Dhananjay Munde: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून पित्ताशयाच्या त्रासामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर येतंय.
पित्ताशयाचा त्रासामुळे रुग्णालयात उपचार
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे गिरगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून पित्ताशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया रविवारी पार पडली आहे. सध्या मुंडेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.