Mumbai University : मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक, उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश असून ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/2023-24/853, दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार सदर पदांकरीता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी वाजतापर्यंत राहणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी सांगितले.
ही बातमी वाचा: