Varsha Raut, ED : ईडीने वर्षा राऊत यांना कोणते प्रश्न विचारले?
Varsha Raut, ED : पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी संपली आहे.
Varsha Raut, ED : पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Case) आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांची चौकशी संपली आहे. वर्षा राऊत यांची चौकशी तब्बल नऊ तास चौकशी झाली.
चौकशीदरम्यान वर्षा राऊत यांनी ईडीने अनेक प्रश्न विचारले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची समोरासमोर चौकशी झाली. मुंबईतील ईडी (ED) कार्यालयात या दोघांची चौकशी झाली आहे. ईडीला संजय राऊत यांच्या घरातून काही कागदपत्रे मिळाले होते. त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ईडी चौकशीत वर्षा राऊत यांना खालील प्रश्न विचारले गेल्याची शक्यता आहे.
- प्रवीण राऊत यांच्याशी झालेले व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का ?
- हे व्यवहार तुम्हाला सांगून करण्यात आले का ?
- तुम्हाला अंधारात ठेवून हे व्यवहार झाले का?
- प्रवीण राऊत यांच्या खात्यातून 1 कोटी 6 लाख रुपये तुम्हाला आलेत ते कशासाठी
- तुमच्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून 1 कोटी 8 लाख रुपयांचे व्यवहार झालेत, हा अनोळखी व्यक्ती कोण ?
- हे पैसे तुम्हाला कुणी पाठवले आणि कश्यासाठी. ?
- अलिबागमधील जमीन खरेदी आणि दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावे खरेदी करण्यात आलाय, ही खरेदी प्रक्रिया कशी पार पडली?
- अलिबागमधील जमीन आणि फ्लॅट खरेदी करताना रोख रकमेचा वापर झालाय का ?
- प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि तुमच्या खात्यात लाखोंचे व्यवहार झालेत, हे कोणाच्या सांगण्यावरून झालेत.
- तुमचे पती संजय राऊत यांनी सांगिल्याप्रमाणे हे व्यवहार झाले आहेत का ?
वर्षा राऊत यांची यापूर्वीही चौकशी
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावलं आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. आता पुन्हा एकदा ईडीनं वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे.