एक्स्प्लोर

पनवेल महानगरपालिका उभारणार सुसज्ज, भव्यदिव्य मुख्यालय! 280 कोटी खर्च होणार

पनवेल महानगरपालिका (Panvel Municipal Corporation) सुसज्ज आणि भव्यदिव्य मुख्यालय उभारणार आहे. यासाठी तब्बल 280 कोटी खर्च होणार आहे.

नवी मुंबई : तिसऱ्या मुंबईतील मुख्य भाग असलेल्या पनवेल शहराला आता स्वतःचे भव्यदिव्य आणि नजर लागेल असे मुख्यालय मिळणार आहे. नजरेत भरेल अशी पनवेल महानगर पालिकेचे सहा मजली मुख्यालय अस्तित्वात येणार आहे. यासाठी एकूण 280 कोटी रूपये खर्च करण्यात येणार असून याला आज सर्वसाधारण सभेत सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला.

सहा वर्षापुर्वी पनवेल नगरपालिकेचे रूपांतर पनवेल महानगर पालिकेत करण्यात आले होते. जुन्या असलेल्या नगरपालिकेच्या इमारती मध्येच महानगर पालिकेचा कारभार गेली सहा वर्ष सुरू आहे. मात्र, जागा अपुरी असल्याने मनपा प्रशासनाच्या विविध खात्याची कार्यालये मुख्यालयात बसवणे अवघड झाले होते. त्यातच महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते  इतर समिती सभापती यांना दालन कुठे आणि कशी द्यायची असा मोठा प्रश्न प्रशासनाला पडला होता. दालनावरून लोकप्रतिनिधी यांच्यात रूसवेफूगवे अनेकवेळा होत होते.

पनवेल महानगरपालिका उभारणार सुसज्ज, भव्यदिव्य मुख्यालय! 280 कोटी खर्च होणार

यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी अखेर पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी भव्य मुख्यालय उभारण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला. यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करीत पाच एकराचा भूखंड मिळवला. याकामी सिडकोला पनवेल मनपाने 25 कोटी 54 लाख रूपये अदा केले. कळंबोली-जेएनपाटी रस्त्यालगत, कर्नाळा स्पोर्टस क्लबच्या समोर हे भव्य मुख्यालय उभं राहणार आहे. यासाठी पहिल्या टप्यात 137 कोटी आणि दुसऱ्या टप्यात 143 कोटी खर्च अपेक्षीत आहे.

प्रस्तावित मुख्यालयाची इमारत ही सहा मजली आहे. तळघर वाहनचालक, फॅनरूम, सर्व्हिस रूम, एसटीपी रूम आणि पार्किंग असणार आहे. तळमजला नागरी सुविधा केंद्र, भांडार विभाग, पत्रकार कक्ष, उपहारगृह, दिव्यांग कक्ष, वाचनालय असणार आहे. पहिल्या मजल्यावरती संगणक कक्ष, बँक एटीएमची सुविधा देण्यात आली आहे. दुसऱ्या मजल्यावरती बहुद्येशीय हॉल, अग्निशमन विभाग, पर्यावरण विभाग, वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, कर विभाग, लेखा विभाग, परिक्षक विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग असणार आहे.

पनवेल महानगरपालिका उभारणार सुसज्ज, भव्यदिव्य मुख्यालय! 280 कोटी खर्च होणार

तिसऱ्या मजल्यावरती पाणी पुरवठा, विद्युत विभाग, मलनिस्सारण विभाग, वैद्यकिय आरोग्य विभाग, ग्रंथपाल, सुरक्षा विभाग, माहिती व तंत्रज्ञान , मालमत्ता विभाग, क्रिडा विभाग, विधी विभाग असणार आहे. चौथ्या मजल्यावरती नगर रचना विभाग, शहर अभियंता विभाग, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) विभाग,अभिलेख कक्ष, भविष्यातील विस्तार करीता मोकळी जागा असणार आहे.

पाचव्या मजल्यावरती महापौर दालन, उपमहापौर दालन,स्थायी समिती दालन, सभागृह नेते दालन, विरोधी पक्ष नेता दालन,कॉन्फरन्स हॉल, समिती बैठक कक्ष,तसेच आयुक्त दालन, अतिरिक्त आयुक्त दालन असणार आहे. सहाव्या मजल्यावरती महासभा सभागृह सचिव कार्यालय,महिला नगरसेविका कक्ष, महिला–बालकल्याण समिती दालन, गटनेते दालन असणार आहे. 
सहाव्या वरच्या मजल्यावरती प्रेस व्हिवींग गॅलरी, व्हिआयपी गॅलरी, ऑडीओ विज्युल रूम, गटनेते दालन,असणार आहे. टेरेसवरती कला दालन असणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget