एक्स्प्लोर

पप्पू कलानीची जन्मठेप 'आजीवन' नाही, विरोधकांकडून खोटी माहिती पसरवल्याचा कलानी कुटुंबाचा आरोप

पप्पू कलानी हा उल्हासनगरमधील इंदर भटीजा हत्याप्रकरणात कारागृहात असून आत्तापर्यंत त्याने साडेतेरा वर्ष शिक्षा भोगली आहे. कैद्याची कारागृहात चांगली वागणूक असल्यास 14 वर्षांच्या पुढची शिक्षा माफ करण्याची तरतूद असून त्यानुसार पप्पू कलानीने येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांकडे याबाबतचा अर्ज केला होता.

उल्हासनगर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एकेकाळचा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण त्याला सुनावण्यात आलेली जन्मठेप ही 'मरेपर्यंत' असल्याचा कुठलाही उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशात नसल्याचा दावा कलानीच्या वकिलांनी केला आहे. पप्पू कलानी हा उल्हासनगरमधील इंदर भटीजा हत्याप्रकरणात कारागृहात असून आत्तापर्यंत त्याने साडेतेरा वर्ष शिक्षा भोगली आहे. कैद्याची कारागृहात चांगली वागणूक असल्यास 14 वर्षांच्या पुढची शिक्षा माफ करण्याची तरतूद असून त्यानुसार पप्पू कलानीने येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांकडे याबाबतचा अर्ज केला होता. मात्र त्याची शिक्षा ही 'मरेपर्यंत' जन्मठेपेची असल्याचं सांगत मृत इंदर भटीजा यांचा भाऊ कमल भटीजा यांनी यावर हरकत घेतली होती. मात्र मुळात सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने पप्पू कलानीची जन्मठेप ही आजीवन असल्याचा कुठलाही उल्लेख आदेशात केलेला नसल्याचा कलानी कुटुंबाचा दावा आहे. भटीजा हे जाणीवपूर्वक आपली बदनामी करत असल्याचा आरोप पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आणि वकील भोजराज जेसवानी यांनी केला आहे. तसंच पप्पू कलानीच्या सुटकेच्या मागणीबाबत येरवडा कारागृहाने विठ्ठलवाडी पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता, मात्र हा गुप्त अहवाल बाहेर उघड कसा झाला? असा सवाल करत पोलिसांवर कारवाईची मागणी करणार असल्याचंही ओमी कलानी यांनी सांगितलं आहे. पप्पू कलानी हा सध्या खुनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वयाच्या सत्तरीत असलेला पप्पू कलानी सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. 1990 साली झालेल्या इंदर भटीजा हत्याप्रकरणात पप्पू याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात त्याने 1990 ते 1997 आणि त्यानंतर 2019 ते 2019 अशी एकूण साडेतेरा वर्ष कारागृहात घालवली आहेत. पप्पू कलानी हा माजी आमदार असून त्याची पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत तर सून पंचम ओमी कलानी या उल्हासनगरच्या महापौर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Achrekar Sir :सर जो तेरा चकराये..कांबळीनं गायलं आचरेकरांचं आवडतं गाणंDevendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget