एक्स्प्लोर

नाव छत्रपतींचं, कृत्य अफझलखानाचं, विरारमध्ये योगींचा सेनेला टोला

'सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय' असं म्हणत आदित्यनाथ यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

विरार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी विरारमध्ये आले. 'सर्वांना माझा नमस्कार, मला विरारमध्ये तुमच्यात येऊन फार आनंद होतोय' असं म्हणत आदित्यनाथ यांनी मराठीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर निशाणा साधला. 'महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांचा जुना आणि जवळचा संबंध आहे. भगवान राम यांना देवत्व प्रदान करणारी भूमी पंचवटी महाराष्ट्रात आहे आणि शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तेव्हा उत्तर प्रदेशच्या काशीतून पुरोहित गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला वेगळं करणारे महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात मात्र कृती अफझल खानासारखी करतात', असं म्हणत योगींनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. 'आज जर सगळ्यात जास्त कोणाला दुःख होत असेल, तर ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. बाळासाहेबांनी कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, तर कायम समोरुन लढा दिला. पण आज शिवसेनेची स्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही. स्वतःच्याच भूमिकेची शिवसेनेने कुत्सित चेष्टा केली आहे', असं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांना तोडून त्यांना जबरदस्ती उमेदवारी देण्याची आवश्यकता नव्हती. हा भाजपचा अंतर्गत विषय होता, आम्ही वनगा कुटुंबीयांचा योग्य सन्मान राखला असता' असंही आदित्यनाथ म्हणाले. विपरित परिस्थितीत सरकार कसं चालवावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget