कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मात्र, ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार वाढल्याचे समोर येत आहे. मुंबईतही अशाच प्रकारे एक फ्रॉड समोर आलाय. भाविकने आपल्या आईला याबद्दल याची माहिती दिल्यानंतर उन्नती जगदाळे यांनी फोन करुन या ऑफरबद्दल विचारणा केली. त्यावर कोरोनामुळे आम्ही स्वस्तात गोष्टी देत असल्याचे फोनवरुन सांगण्यात आले. त्यावर उन्नती यांनी अधिक चौकशी केली असता या वस्तू मिळवण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल ज्यात तुम्हाला बँकेची माहिती द्यावी लागेल असे सांगण्यात आले.
फोनवरुन अश्लिल बोलणं
फोनवर बोलणे झाल्यानंतर उन्नती यांनी या ऑफरच्या चौकशीसाठी हॉटेलमध्ये फोन लावला तर काही दिवसांपासून हॉटेल बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उन्नती यांनी पुन्हा फोन केल्याने समोरच्या व्यक्तीला याची शंका आली. त्यानंतर उन्नती यांच्यासोबत तो अश्लिल बोलायला सुरुवात केली. सध्या लॉकडाऊन असल्याने उन्नती जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात जाता आले नाही. मात्र, त्या ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर नाही : अजित पवार
ऑनलाईन फ्रॉडपासून दूर राहा
कोरोना व्हायरसमध्ये अनेक लोकांचे हाल होत आहे. ज्यांचे हातावर पोट होते असे अनेकजण आज रस्त्यावर आलेत. या पार्श्वभूमीवर अनेकांनी पुढाकार घेत त्यांना मदत सुरू केलीय. मात्र, या ऑनलाईन मदतीच्या माध्यामातून फ्रॉड होत असल्याचे समोर येत आहे. अनेक ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाई पैसे ट्रान्सफर करण्याची विनंती केली जात आहे. सरकारी जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे ज्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. अशा लोकांना नक्कीच मदत करायला हवी. मात्र, कोणालाही मदत करताना त्याची शहानिशा केल्याशिवाय मदत करू नका. कारण, तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते.
Cyber Crime | कोरोनाच्या दहशतीत सायबर घोटाळ्याची भर; बँक डिटेल्स मागवून फसवणुकीचा प्रकार