मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत, त्या सर्व परिसरांचे 'जीआयएस मॅपिंग' करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कार्यवाही झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील ज्या परिसरांमध्ये 'करोना' बाधितांची संख्या अधिक असेल, त्या परिसरांचे नकाशे आणि संख्यात्मक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.


नागरिकांना आपली काळजी आपापल्या स्तरावर योग्य प्रकारे घेता यावी, यासाठीच पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावर देखील या अनुषंगाने कार्यवाही करणे सुलभ व्हावे या उद्देशाने याबाबतची माहिती संकेतस्थळाद्वारे सार्वजनिक करण्यात येणार आहे.

या माहितीद्वारे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अधिक सजगपणे स्वतःची काळजी घेणं सोप जाणार आहे. तसेच त्या परिसरात काही आवश्यक कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनाही अधिक सहजपणे प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येऊ शकेल. महापालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांनी घरामध्येच राहणे आणिआपली काळजी घेणे आवश्यक आहे. तथापि, ज्या परिसरात बाधितांची संख्या अधिक असेल,  त्या परिसरातील नागरिकांना तुलनेने अधिक काळजी घेणे,  अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतच जात आहे. सध्या देशात 1613 कोरोनाग्रस्त आहेत. तर यापैकी 35 लोकांचा मृत्यू झाला असून 148 लोकांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्रात मंगळवारी COVID-19 चे 72 नवे रूग्ण आढळून आले. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 300 पार गेला आहे.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | मुंबईत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरन्टाईन करणार : महापौर


सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


Coronavirus | देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; एकूण 1613 कोरोनाग्रस्त तर 35 जणांचा मृत्यू


31 मार्च | ऐतिहासिक दिवस, बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतरत्नची 30 वर्षे!

Coronavirus | असा झाला दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये कोरोनाचा फैलाव! गुन्हा दाखल करण्याचा केजरीवाल सरकारचा आदेश