एक्स्प्लोर

काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर पैसे उधळणारा मनसे पदाधिकारी आहे.

मुंबई : मुंबईतील काँग्रेस आमदार आणि माजी पालकमंत्री नसीम खान यांच्यावर पैसे उधळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. चांदिवली भागात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात खान यांच्यावर नोटा उधळल्या गेल्याची माहिती आहे. या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यास नसीम खान यांनी नकार दिला आहे. मुंबईतील चांदिवली भागात हिमालय मित्र मंडळात काल (सोमवारी) रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पैसे उडवले जात असताना नसीम खानही आनंदाने पाहत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेची झोड उठली आहे. महत्त्वाचं म्हणजे कालच नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असल्याची चिंता व्यक्त केली होती. नसीम खान हे चांदिवली विधानसभेतून काँग्रेसचे आमदार आहेत. नसीम खान यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. मी भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी स्वागत करताना पैसे उडवण्यात आले, असं नसीम खान यांचं म्हणणं आहे. आपण पैसे उडवण्यापासून रोखल्याचा दावाही नसीम खान यांनी केला आहे. 'एबीपी माझा'ने नसीम खान यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला आहे. 'आपण भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यांच्या प्रथा-रुढी-परंपरांविषयी मला माहिती नाही. मला त्यांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता. त्यामुळे मी दिलगिरी करण्याचा प्रश्नच येत नाही. कार्यक्रमाच्या आयोजकांकडे आपण स्पष्टीकरण मागावं.' असं नसीम खान म्हणाले. नसीम खान यांच्यावर पैसे उधळणारी व्यक्ती मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली आहेत. 2012 साली भानुशाली यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. आमदार नसीम खान यांच्यावर नोटांची उधळण आमदार नसीम खान यांचा दिलगिरी व्यक्त करण्यास नकार

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात विषारी ताडीचा तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
मोठी बातमी : अंधेरी MIDC परिसरात विषारी ताडीचा तिसरा बळी, 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा
मुंबईकरांनो सावधान! वातावरणात मोठा बदल, तापमानाचा पारा 38 अंशाच्या पुढे, हवामान विभागानं दिला इशारा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Embed widget