एक्स्प्लोर
भगवदगीता आणि संविधान एकच : मुख्य न्यायमूर्ती
मुंबई: भगवदगीता जीवन जगण्याची कला आहे. त्याप्रमाणाचे माणसाने कसे जगावे हे संविधान शिकवते. त्यामुळे भगवद् गीताच संविधान आहे आणि संविधान हेच भगवद् गीता आहे, असे मत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
देशभरात 26 नोव्हेंबर रोजी संविधान साजरा झाला. केंद्र आणि राज्य शासनाने 26 जानेवारीच हा दिवस साजरा करावा, असे आदेश सर्व सरकारी कार्यालये तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांना दिले होते. उच्च न्यायालयात मात्र 5 दिवस उशिरा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर यांनी हे मत व्यत केले.
26 नोव्हेंबरला शनिवार होता. न्यायालयाला सुट्टी होती. त्या दिवशी कार्यक्रम घेता आला नाही, असे मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
संविधान दिन हा एकाच दिवशी साजरा करण्याचा दिवस नाही. तो दिवस खूप छान आहे. त्याच दिवशी साजरा करावा, असे म्हणणे ठिक आहे. पण हा दिवस दररोज साजरा झाला पाहिजे. या देशातील प्रत्येक नागरिकाने संविधानाबाबत जाणून घेतले तर हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक नागरिकाला शांतपणे झोप लागेल, अशी व्यवस्था संविधानात करण्यात आली आहे. तसा अधिकारच संविधानाने दिला आहे. आवाज करण्याचा मला अधिकार आहे, असा कोणी दावा करत असेल तर दुसऱ्याची शांतता भंग करण्याचा तुला अधिकार नाही, असे संविधान नियम मोडणाऱ्यांना सांगतो. त्यामुळे संविधानाचा आदर सर्वांनी करायलाच हवा. भगवद् गीतेत जीवन मूल्यांची शिकवण आहे. तशीच शिकवण संविधानात आहे, असे मत मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement