Ideas of India: भारताच्या नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेक सिंग अहलुवालिया आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी एबीपी आयडियाज ऑफ इंडियाच्या (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. यावेळी राजीव कुमार म्हणाले आहेत की, ''जर कोरोनाची चौथी लाट आली नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था 8 टक्के दराने वाढेल. तसेच पुढील आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते. अशा परिस्थितीत 2030 पूर्वी भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो.'' 


भारताला 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट कधी गाठता येईल यावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आपले दोन वर्ष कोरोना संकटात गेले आहेत. तसेच जागतिक तणावामुळे (रशिया-युक्रेन युद्ध) वस्तूंच्या किमती किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे.'' राजीव कुमार म्हणाले, कोरोनाची चौथी लाट आली नाही, तर आपण आठ टक्के विकास दर गाठू शकलो. तसेच पुढील आठ वर्षांत आपली अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते. भारत 2030 पूर्वी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो.   


राजीव कुमार म्हणाले की, राज्य सरकारे त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खाजगीकरण कधी करणार, हे सांगणे कठीण आहे. पण भारत सरकारने एअर इंडियाचे खाजगीकरण केले आहे. ते म्हणाले की, शासनाच्या कारभारात सुधारणा झाली असून 400 योजनांचे पैसे थेट नागरिकांच्या बँक खात्यात जात आहेत. ते म्हणाले, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि इतर सत्ताधारी पक्षांची राज्य सरकारे केंद्र सरकारचे धोरणे पुढे नेत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: