एक्स्प्लोर
मुंबई पोलिसांचा नवा उपक्रम, प्रशिक्षणार्थींना भरतीपूर्व प्रशिक्षण
पोलीस होण्याचं अनेक मुलांचे स्वप्न असतं, सध्या पोलीस भरतीचे फॉर्मही निघाले आहेत. या त्यांच्या स्वप्नांना आता पोलिसांकडूनही पाठबळ मिळणार आहे.

मुंबई : पोलीस होण्याचं अनेक मुलांचे स्वप्न असतं, सध्या पोलीस भरतीचे फॉर्मही निघाले आहेत. या त्यांच्या स्वप्नांना आता पोलिसांकडूनही पाठबळ मिळणार आहे. मुंबई (दक्षिण प्रादेशिक विभाग) पोलिसांनी नवीन आणि प्रथमच वेगळा असा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामध्ये मुलांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 'पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर' असे या उपक्रमाचे नाव आहे. आज (शनिवार) या उपक्रमाचा पहिला श्रीगणेशा वडाळा पोलीस स्टेशनने आज केला. या शिबिरामध्ये मुलांना लेखी आणि शारीरिक पोलीस भरतीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. 'ग्रामीणपेक्षा शहरी मुलांना अशाप्रकारच्या परीक्षेची माहिती खूप कमी असते किंवा परिस्थितीमुळे त्यांना खाजगी प्रशिक्षण घेता येत नाही. त्यांच्यासाठी आम्ही हा उपक्रम राबविला आहे.' असे मुंबई पोर्ट विभागाच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितलं. दरम्यान, या शिबिराचा खूप फायदा झाल्याचं प्रशिक्षणार्थींनी यावेळी सांगितलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























