एक्स्प्लोर

एनडीएचा मृत्यू झाला आहे, शिवसेनेची संतप्त प्रतिक्रिया

एनडीएची हत्या झाली आहे, एनडीए फक्त बैठकीपुरतंच असल्याचा हल्लाबोल संजय राऊतांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर केला आहे.

मुंबई : एनडीएची हत्या झाली आहे, एनडीए फक्त बैठकीपुरतंच असल्याचा हल्लाबोलही खासदार संजय राऊतांनी शपथ विधीनंतर  केला आहे. तसंचआम्ही मंत्रिपदासाठी हपापलेलो नाही, हा सगळा आकड्यांचा खेळ आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही आमचं म्हणणं मांडू असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. एनडीए केवळ कागदोपत्री आहे. जेव्हा भाजपला पाठिंबा हवा असतो तेव्हा त्यांना एनडीएची आठवण येते, राष्ट्रपतीपदाची निवडणूक, उपराष्ट्रपदाची निवडणूकीवेळी एनडीएला विचारलं जातं. मात्र बाकी वेळी एनडीएचा विचार केला जात नाही, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेलाही कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती, मात्र भाजपनं कोणत्याही मित्रपक्षाला या मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. भाजपच्याच नेत्यांचा आज शपथविधी झाला आहे. आजच्या ज्या मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, तर 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीही उपस्थित होते. एकूण 13 मंत्र्यांनी शपथ घेतली. ज्यामध्ये 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदावर प्रमोशन देण्यात आले आहे, तर 9 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या मंत्र्यांमध्ये 4 माजी अधिकारी आहेत. धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमन, पियुष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना प्रमोशन मिळालं असून, त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी ABP MajhaSushma Andhare Vs Aditi Tatkare :4 जूनला आमच्यासोबत गुलाल खेळा, अदिती तटकरेंचं अंधारेंना प्रत्युत्तरSupriya Sule : टॅक्स कमी करा, नाहीतर भरणार नाही : सुप्रिया सुळे ABP MajhaPM Narendra Modi Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Supriya Sule on Ajit Pawar : मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
मलिदा गँग गेल्यापासून गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला
Manoj Jarange: सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मीदेखील निवडणुकीला उभा राहीन: मनोज जरांगे पाटील
सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मीदेखील निवडणुकीला उभा राहीन: जरांगे पाटील
Embed widget