एक्स्प्लोर
मला राजदंड मतदारसंघात नेऊ द्या : जितेंद्र आव्हाड
जेव्हा राजदंड उचलतात, तेव्हा सभागृह तहकूब झालं पाहिजे. मात्र राजदंड उचलल्यावरही आज कामकाज सुरु होतं' असं जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे
मुंबई : विधीमंडळातील राजदंड मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्या, अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादीचे मुंब्रा-कळव्यातील विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवलं आहे.
'विधीमंडळातील राजदंड मला माझ्या मतदारसंघात घेऊन जायचा आहे, असं पत्र मी विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. अध्यक्ष असतात तेव्हा राजदंड असतो, ते जातात तेव्हा राजदंड जातो. ते प्रातिनिधिक सन्मानचिन्ह असतं. जेव्हा राजदंड उचलतात, तेव्हा सभागृह तहकूब झालं पाहिजे. मात्र राजदंड उचलल्यावरही आज कामकाज सुरु होतं' असं आव्हाड म्हणाले.
'राजदंड उचलून जर प्रथा-परंपरा तुडवण्यात येत असतील आणि राजदंड जर शोभेची वस्तू म्हणून राहणार असेल, तर तो मला मतदारसंघात घेऊन जाऊ द्यावा' अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी पत्रातून केली.
विधीमंडळात नेमकं काय झालं?
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा, धनगर आरक्षणानंतर आता मुस्लिम आरक्षणावरुन मुस्लिम आमदार आक्रमक झाले. अबू आझमी, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, सतीश पाटील, अमीन पटेल आणि असलम शेख हे सहा आमदार एकत्र आले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला.
आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कागद भिरकावले. त्यानंतर राजदंड पळवण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. यावरुन विधानसभेत जोरदार गोंधळ झाला. या गदारोळातच विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाज तहकूब होण्याची दिवसभरातली चौथी वेळ होती.
"आम्ही कधी सेलिब्रेशन करायचं, मुख्यमंत्री तारीख सांगा," असं बॅनर घेऊन एमआयएमचे आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात उभे होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement