एक्स्प्लोर
बसण्याच्या जागेवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमित तिवारी विरोधात जातीवाचक शिविगाळ प्रकरणी अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुंबई : लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडत असल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळत आहे. साकीनाक्यात शनिवारी रात्री आयोजित केलेल्या बैठकीत बसण्याच्या जागेवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात काही कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळतेय. बैठकीत स्थानिक पदाधिकारी आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमित तिवारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर तिवारीला बाहेर काढण्यात आलं. काही वेळानं तिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह बैठकस्थळी दाखल झाला आणि तोडफोड करत बैठक उधळून लावली. दरम्यान, अमित तिवारी विरोधात जातीवाचक शिविगाळ प्रकरणी अट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद आधीच कमी पडत असल्याचे महापालिका निवडणुकीतल्या निकालावरुन दिसून आले आहे. अशात मुंबईत एकजुटीने काम करण्याची पक्षाला नितांत गरज असताना, पक्षातच दोन गट पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















