एक्स्प्लोर

अजित पवार तडकाफडकी का गेले? शरद पवारांनी सांगितले कारण...

दरम्यान, अचानक ही बैठक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आ . या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. तसेच आपण बारामतीकडे निघालो आहोत असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मुंबई : राज्यामध्ये सत्तास्थापनेच्या गोंधळात आता आणखी भर पडली आहे. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होणारी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व महत्वाचे नेते शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे बैठकीला उपस्थित झाले होते. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुंबईतच आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी हजर आहेत. उद्या सकाळी अजित पवार तुम्हाला भेटतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांनी चेष्टेने एखादी गोष्ट सांगितली, तरी तुमच्या गाड्या त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे त्यांची प्रायव्हसी जाते. त्यामुळे अजित पवारांनी ठरवून मी बारामतीला जातोय असं सांगितलं, असंही शरद पवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. तसे प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होत आहे. मात्र तिन्ही पक्षातील ठोस बोलणी अद्याप होऊ शकले नसल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक रद्द झाल्याने, राजकारणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, अचानक ही बैठक रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या बैठकीतून अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. तसेच आपण बारामतीकडे निघालो आहोत असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी घेरल्यानंतर बैठक रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर बैठक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही बैठक रद्द झाल्याचे सांगितले. कॉंग्रेसची बैठक संपली आहे. यात प्राथमिक चर्चा केली आहे. आता राष्ट्रवादीचा निरोप आल्यावर बैठकीला जाऊ, असे कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान कुठलाही वाद नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले. दोन्ही पक्षांमध्ये खूप चांगला समन्वय आहे. आज चर्चा झाली नसली तरी उद्या चर्चा होईल, असे ते म्हणाले. मला याबाबत काही कल्पना नाही, मी शेवटच्या क्षणी बैठकीत आलो, असे सुनील तटकरे बैठकीनंतर म्हणाले. बैठक रद्द झाल्याची माहिती नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget