एक्स्प्लोर

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतून पाच कोटी रुपयांच्या सव्वा लाखांहून अधिक नशेच्या गोळ्या अन् औषधं जप्त 

Crime News : एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी छापा टाकून पाच कोटी रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि औषधं जप्त केली आहेत.  

Crime News : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विविध ठिकाणी छापा टाकून पाच कोटी रुपयांच्या नशेच्या गोळ्या आणि औषधं जप्त केली आहेत. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या 1 लाख 32 हजार अलप्राझोलम गोळ्या आणि CBCS बोटल्स जप्त करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी एनसीबीने एकाला अटक केली आहे.  

मुंबई एनसीबीने मुंबईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा या कारवाईतून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एनसीबीने 1,32,000 अल्प्राझोलम गोळ्या आणि 2,400 CBCS बाटल्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मुंबई आणि नवी मुंबईतीन विविध भागात करण्यात आली.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबईत नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीची माहिती एनसीबीला मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करून एनसीबीने डोंबिवलीत राहणाऱ्या एस. यादव नावाच्या व्यक्तीला अटक केली. यादव मुंबई आणि आजूबाजूच्या भागात नशेच्या औषधांचा पुरवठा करत होता. अधिक चौकशी केल्यानंतर त्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील टोळ्या या नशेच्या औषधांची तस्करी करत असल्याचे यादव याने सांगितले. त्यानंतर एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईतील काही ठिकाणी छापेमारी केली. यावेळी या छापेमारीत पाच कोटी रूपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आढळून आल्या. 

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात बेकायदेशीर औषधांची मुंबईत विक्री करण्यासाठी एक टोळी येणार होती. परंतु, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी वाढलेल्या सुरक्षेमुळे तस्करांनी त्यांचे वेळापत्रक काही दिवसांसाठी पुढे ढकलले. प्रजासत्ताक दिनानंतर कुरिअरमार्फत ही औषधे मुंबईत पोहोचली. याबाबत एनसीबीला माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी एनसीबी अधिकारी कुरिअर कंपनीत पोहोचले.त्यावेळी  एस. यादव माल घेण्यासाठी तेथे पोहोचला. यावेळी एनसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याला अडवले आणि चौकशी केली. यावेळी यादव उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. परंतु, नंतर त्याने बेकायदेशीर औषधांचं पार्सल घेण्यासाठी आल्याचे कबुली दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी पार्सल उघडून पाहिलं असता अल्प्राझोलमच्या 1,32,000 गोळ्या आढळल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यादवकडून माहिती घेऊन मानखुर्द येथे एक वाहन अडवले. यावेळी या वाहनातून देखील अवैध औषधे जप्त केली. 

 या कारवाईनंतर एनसीबीकडून मुंबईतील गोवंडी, ठाणे, धारावी इत्यादी ठिकाणच्या वितरण नेटवर्कवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एससबीने आंतरराज्य पुरवठादार आणि स्थानिक ड्रग्ज विकणाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.  

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC OC Abhay Scheme : मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
मोठी बातमी: भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींना दिलासा, OC अभय योजनेला मंजुरी; सर्वसामान्यांना काय फायदा?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget