Nawab Malik on NCB : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी पंचावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्या कथित संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल केली आहे. 


नवाब मलिक यांनी व्हायरल केलेल्या क्लिपमध्ये एनसीबी अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला पंचनाम्यात बदल करुन सही करण्यासाठी सांगण्यात आल्याचा दावा केलाय. नवाब मलिकांनी म्हटले की, ''मागील काळात बनवलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत आहे. एक मॅडी नावाचा पंच आहे. एनसीबीचा किरण बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला ऑफिसमध्ये न बोलावता ऑफिसबाहेर बोलावून पंचनामा बदलण्याबाबत बोलत आहे. तसेच अधिकारी पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत.'' मलिकांनी दावा केलाय की, समीर वानखेडे देखील त्यांना सही करण्याबाबत सांगत आहेत. 


Mumbai Nawab Malik: नवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉंम्ब


याशिवाय मलिकांनी आणखी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल केली आहे. ही संबंधित ऑडीओ क्लिप एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पंच मॅडी यांच्यातील संभाषण असल्याचा मलिकांनी दावा केला आहे. या क्लिपमध्ये एनसीबी अधिकारी किरम बाबू यांनी मॅडी नावाच्या पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी बोलावण्यात आल्यावर पंच मॅडीने वानखेडे यांनी फोन करुन बाबू यांनी भेटण्यासाठी जाण्याबाबत आणि सही करण्याबाबत विचारले असता. वानखेडेंनी पंचाला सही करण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha