Coronavirus India : देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीने चिंता वाढवली आहे. दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये मुंबईत आज 6 हजार 347 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात 631 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे. पण फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार का? हा प्रश्न भेडसावत आहे. 


दिल्लीतील परिस्थिती काय?
राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या संख्येनं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी आढळेल्या रुग्णसंख्येपेक्षा आज दुप्पट रुग्ण आढळले आहेत. शनिवारी दिल्लीत 2716  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राजधानी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट 3.64 टक्के इतका झाला आहे. दिल्लीतील सक्रिय रुग्णाची संख्याही सहा 360 इतकी झाली आहे. दिल्लीमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिल्लीत ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 351 इतकी झाली आहे. 


पश्चिम बंगाल - 
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णाचा स्फोट झाला आहे. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये चार हजार 512 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णाचा मृत्यू झालाय. शनिवारी पश्चिम बंगालमध्ये दोन नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 16 झाली आहे.  


केरळ - 
केरळ राज्यात शनिवारी दोन हजार 435 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर 22 जणांचा मृत्यू झालाय.


तामिळनाडू - 
तामिळनाडूमध्ये शनिवारी एक हजार 489 रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील 682 रुग्ण चेन्नई शहरातील आहेत. शनिवारी राज्यात आठ रुग्णाचा मृत्यू झाला. 


गुजरात - 
गुजरातमधील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी राज्यात एक हजार 69 नव्या कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. याच कालावधीत एका रुग्णाचा मृत्यू झालाय तर 103 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अहमदाबादमध्ये शनिवारी 559 रुग्णाची नोंद जाली आहे. तर 164 सुरत आणि 67 वडोदरा येथील रुग्ण आहेत.  मागील 24 तासांत गुजरातमध्ये 23 ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. यामधील 11 अहमदाबाद शहरातील आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 136 इतकी झाली आहे.  


कर्नाटक - 
कर्नाटकमध्ये शनिवारी एक हजार 33 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याकालावधीत पाच रुग्णाचा मृत्यू झालाय.  


पंजाब - 
शनिवारी पंजाबमध्ये 332 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 42 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या एक हजार 41 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.


उत्तराखंड - 
शनिवारी उत्तराखंडमध्ये चार ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर राज्यात शनिवारी 118 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत  34 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. 


राज्यस्थान - 
शनिवारी राज्यस्थानमध्ये 52 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 121 इतकी झाली आहे.  आज आढललेल्या ओमायक्रॉनच्या 52 रुग्णापैकी 38 रुग्ण जयपूरमधील आहेत.