Florona : जगभरात एकीकडे कोरोनाचं (Coronavirus) संकट कायम असताना आता फ्लोरोनाचा आजाराचा धोका समोर आला आहे. फ्लोरोना हा आजार कोविड-19 आणि इन्फ्लूएंझाचा दुहेरी संसर्ग असल्याचं सांगितलं जात आहे. या आजार अद्याप सविस्तरपणे माहिती नाही. इस्रायलमध्ये संसर्गाचा हा नवीन प्रकार आढळून आला आहे. याचे वर्णन कोरोनाव्हायरस आणि इन्फ्लूएंझा यांचे मिश्र स्वरूप म्हणून केले जात आहे. या संसर्गाबाबत माहिती देताना वृत्तपत्रात सांगण्यात आले की, फ्लोरोना नावाचा संसर्ग इस्त्राइलमधील एका गर्भवती महिलेमध्ये आढळला आहे. या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


काय आहे 'फ्लोरोना' रोग?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही फ्लोरिना काही नवीन आजार किंवा नवीन प्रकार नाही. प्लोरोना हा कोविड-19 आणि एन्फ्लूएंझाचा (Influenza) डबल इन्फेक्शन असल्याचं म्हटलं जातं आहे. यामध्ये, रुग्णाला कोविड-19 विषाणूसह इन्फ्लूएंझा व्हायरसचा संसर्ग होतो, ज्यामुळे हा संसर्ग कोविड-19 पेक्षा दुप्पट धोकादायक बनू शकतो. मार्च 2020 मध्ये जगात कोविड-19 महामारी सुरू झाल्यानंतर प्रथमच असा संसर्ग दिसून आला आहे.


फ्लोरोनाची लक्षणं काय?
इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे न्यूमोनिया, मायोकार्डिटिस यासारखी अनेक गंभीर लक्षणे उद्भवतात. ज्यामुळे काहीवेळा रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे न्यूमोनियासह इतर श्वसनास त्रास देखील होऊ शकते. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका खूप वाढतो.


इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने आणि रोग नियंत्रण केंद्रांनी एक चेतावणी जारी केली आहे की हा संसर्ग वेगाने पसरू शकतो किंवा गेल्या एका आठवड्यापासून पसरत आहे. 1800 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha