मुंबई : आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लिम महिलांची इंटरनेटवर बदनामी करण्यात येत आहे. मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन अॅपवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्यानं देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांत तक्रार केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.  या प्रकरणी  केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे तक्रार केली आहे, मात्र ते दखल घेत नसल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.


दिल्लीत एका महिलेने असे प्रसिद्ध केलेले फोटो ट्वीटरवर शेअर केले होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यानंतर या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. हाच मुद्दा प्रियंक चतुर्वेदी यांनी उचलून धरला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच सायबर सेलकडे देखील त्यांनी तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या पद्धतीने महिलांच्या फोटोंचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 


यासंदर्भात एबीपी माझाने प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांचे फोटो गिटहब  या अॅपवर टाकून त्यांची बदनामी केली जात आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. याप्रकरणातील काहीजण हे मुंबईचे असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना याबाबत कोणताही तपास लागला नाही. ते याप्रकरणाचा छडा लावण्यात असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सन्मान राहणे गरजेचे आहे. महिलांच्या विरोधात कोणाही काही बोलले तर त्याविरोधात शिवसेना कायमच महिलांच्या समर्थनार्थ उभी राहिली आहे. महिलांच्या परवानगिशिवाय त्यांचे फोटो प्रसिद्ध कसे केले जातात. याचा खुलासा रणे गरजेचे आहे.  दरम्यान, केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे यांच्याकडे याबाबत सांगितले होते, मात्र, त्यांच्याकडून सतर्क असून, कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र,अद्याप कारवाई झाली नसल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. 
 


महत्त्वाच्या बातम्या: